बेळगाव—belgavkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील 13 पोलीस उपअधीक्षक, 278 पोलीस निरीक्षक व उत्तर विभागातील 176 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. बेळगाव शहर व जिल्ह्यातील बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर शेखरप्पा एच. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी यांची गुप्तचर विभागात बदली करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील बहुतेक पोलीस निरीक्षकांच्या गुलबर्गा, विजापूर आदी जिल्ह्यात बदल्या झाल्या आहेत. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी यांची गुलबर्गा शहर वाहतूक विभागात, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांची गुलबर्गा चौक पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.
टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी यांची गुलबर्गा ग्रामीण पोलीस स्थानकात तर मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश द्यामण्णावर यांची विजापूर येथील गांधी चौक पोलीस स्थानकात बदली झाली आहे. शहर सीईएनचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे यांची विजापूर महिला पोलीस स्थानकात, उद्यमबागचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील यांची हुबळी-धारवाड येथील विद्यानगर पोलीस स्थानकात, बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांची पीटीएस खानापूर येथे तर सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार यांची विजापूर येथील सीईएन पोलीस स्थानकात बदली झाली आहे.
जिल्हा सीईएन पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांची पीटीएस खानापूर येथे तर जिल्हा महिला पोलीस ठाण्याचे सुनील पाटील यांची इंडी ग्रामीण पोलीस स्थानकात, डीसीआरबी विभागाचे प्रल्हाद चन्नगिरी यांची वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात, बागलकोट येथील डीएसबी विभागाचे गुरुशांत दाशाळ यांची हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात नियुक्ती झाली आहे.
सीसीआरबी विभागाचे आर. आर. पाटील यांची मुधोळ पोलीस स्थानकात, वाहतूक उत्तरचे श्रीशैल गाभी यांची बेळगाव येथील डीसीआरई विभागात, शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी यांची डीएसबी बागलकोट येथे, हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक तुकाराम निलगार यांची डीएसबी विजापूर येथे, वाहतूक दक्षिणचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांची गुलबर्गा येथील अशोकनगर पोलीस स्थानकात बदली झाली आहे.
गुलबर्गा येथील सीसीबीचे दिलीपकुमार सागर यांची उद्यमबाग पोलीस स्थानकात, शहाबाद ग्रामीणचे जगदेवाप्पा यांची वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात, चित्तापूरचे चंद्रशेखर यांची शहापूर पोलीस स्थानकात, बिदर येथील डीसीआरबीचे गाळ्याप्पा पेनग यांची सीसीबी विभागात तर बिदर ग्रामीणचे मल्लिकार्जुन यातनूर यांची शहर एसबी विभागात बदली झाली आहे. गुलबर्गा येथील वाहतूक विभागाचे ख्वाजा हुसेन यांची एपीएमसी पोलीस स्थानकात, विजापूर गांधी चौक पोलीस स्थानकाचे प्रदीप तलकेरी यांची मार्केट पोलीस स्थानकात, गुलबर्गा येथील चौक पोलीस स्थानकाचे राघवेंद्र यांची खडेबाजार पोलीस स्थानकात, विजापूरचे सीईएन विभागाचे रमेश आवजी यांची जिल्हा सीईएन विभागात, तर गुलबर्गा येथील सीईएन विभागाचे सोमलिंग किरेदळ्ळी यांची शहर सीईएन विभागात बदली झाली आहे.
अब्दुल वाजिद पाटील (मुडलगी पोलीस ठाणे), अरुणकुमार (रायबाग), रायगोंडा जनार (गोकाक), हसनसाब मुल्ला (चडचण), महादेव शिरहट्टी (यमकनमर्डी), चन्नकेशव टिंगरीकर (आयजीपी कार्यालय), नचिकेत जनगौडा (बेळगाव ग्रामीण), नागय्या काडदेवर (चिकोडी), सुरेश बंडेगुंबळ (सौंदत्ती), रामचंद्र नायक (खानापूर), मल्लाप्पा हुगार (बैलहोंगल), जयंत गवळी (हुक्केरी), मलकाजाप्पा दप्पीन (कित्तूर), उमेश एम. (काकती), इम्रान बेग (सीसीआरबी बेळगाव), केशवमूर्ती एन. एन. (बेळगाव शहर महिला पोलीस ठाणे), कपिलदेव गाडद (टिळकवाडी).
Belgaum Police Transfer Loksabha belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news. Belgaum Police Transfer Loksabha. Belgaum Police Transfer Loksabha
Belgaum Police Transfer Loksabha
Belgaum Police Transfer Loksabha
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements