केवळ एकाच मराठी शाळेची निवड
बेळगाव-belgavkar : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 7 सरकारी शाळांची प्रधानमंत्री स्कूल ऑफ रायझिंग इंडिया (पीएमश्री) योजनेमध्ये निवड झाली आहे (PM Schools for Rising India (PM SHRI)). या शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने विकासकामे राबविली जाणार आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातून 100 शाळांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी केवळ 7 शाळांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी शाळांच्या विकासासाठी PM SHRI योजना सप्टेंबर 2022 मध्ये सुरू केली.
सरकारी शाळांमध्ये चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी मॉडेल स्कूलच्या धर्तीवर पीएमश्री योजना लागू करण्यात आली. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या शाळांपासून प्रायोगिक तत्त्वावर केली जाणार आहे. देशातील 2 लाख 50 हजार सरकारी शाळांमधून 9 हजार शाळांची योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 2 कोटी 9 लाख रुपये शाळेसाठी अनुदान दिले जाणार आहे. यातून शाळेमध्ये अत्याधुनिक वर्गखोल्या, स्वच्छतागृह, बगीचा याचबरोबर प्रशस्त मैदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील 7 शाळांची 2023 मध्ये निवड झाली होती. ही रक्कम शाळांना टप्प्याटप्प्याने खर्च करता येणार आहे. जिल्हाशिक्षणाधिकारी पवनकुमार हंचाटे म्हणाले, सरकारी शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम, क्रीडा साहित्य, ग्रंथालय व सुसज्ज प्रयोगशाळा अशा सुविधा पुरविण्यासाठी पीएमश्री योजना महत्त्वाची ठरणार आहे. शिक्षकांनाही यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात बेळगाव शहर, तालुका व खानापूर या परिसरात मराठी माध्यमांच्या शाळा अधिक प्रमाणात आहेत. परंतु शैक्षणिक जिल्ह्यात केवळ एकाच मराठी शाळेची पीएमश्री योजनेमध्ये निवड करण्यात आली आहे. उचगाव येथील उच्च प्राथमिक शाळेची या योजनेमध्ये निवड झाली असून शाळेला 14 लाख 7 हजार रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आला आहे. तर खानापूर येथील कन्नड उच्च प्राथमिक शाळेची निवड झाली असून 9 लाख 9 हजार रुपयांचा निधी शाळेला दिला आहे.
belgaum PM SHRI School
belgaum PM SHRI School
belgaum PM SHRI School
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310