पानिपतच्या युद्धात प्राणांची बाजी लावणाऱ्या मराठा वीरांचे स्मरण
बेळगाव—belgavkar : 14 जानेवारी म्हणजे संक्रांत असं समीकरण असलं तरी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी या दिवसाची आणखी एक ओळख आहे. 14 जानेवारी 1761 याच दिवशी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शहा अब्दालीसारख्या परकीयाचं आक्रमण रोखण्यासाठी मराठ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती. आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी शिवतेज युवा संघटना, मच्छे-बेळगाव यांच्यातर्फे रविवारी ‘पानिपत शौर्य दिन’ कार्यक्रम होणार आहे.
त्यानिमित्त महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यानात सायंकाळी 6 वाजता सुदर्शन शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. गोवा येथील दत्त पद्मनाभ पीठाचे ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांची प्रमुख उपस्थिती असेल. सर्वांनी उपस्थित राहावे, असे शिवतेज युवा संघटनेने कळविले आहे. अहमद शहा अब्दालीच्या विरोधात मराठा साम्राज्याचे तिसरे पानिपत युद्ध झाले होते. या लढाईत मराठा वीरांनी प्राणांची बाजी लावली होती.
दिल्लीपासून सुमारे 90 किमी अंतरावरील ‘पानिपत’ या कुरक्षेत्राच्या शेजारच्या मोकळ्या मैदानावर 14 जानेवारी 1761 रोजी मराठे आणि अफगाणिस्थानचा दुराणी बादशहा अहमदशाह अब्दाली यांच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले. देशावरचे परचक्र परतवून लावण्याच्या प्रयत्नांत महाराष्ट्रातली एक अखंड पिढी गारद झाली.
Belgaum Panipat Shourya Din Panipat belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum Panipat Shourya Din Panipat_resize_26
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310