तुमच्या नावे ड्रग्जचं पार्सल पाठवलंय; ₹ 6.5 लाखांची फसवणूक
पार्सलमध्ये ड्रग्सच्या नावावर कशी केले जातेय फसवणूक, सायबर ठगांकडून कसा सुरु आहे प्रकार
बेळगाव—belgavkar : बेळगाव शहरात गुन्हेगारी वाढत असताना सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार उघड होत आहेत. विविध माध्यमातून लोकांना जाळ्यात ओढत त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. कधी बँकेचे खाते रिकामे केले जाते? कधी सोशल मीडियाच्या खात्याचा वापर केला जातो, आता फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगत बेळगाव शहरात अनेकांची फसवणूक केली गेलीयं.
तुमच्या नावे अमलीपदार्थांचे पार्सल आले आहे, असे सांगत सायबर गुन्हेगारांच्या एका टोळीने नार्वेकर गल्ली, शहापूर येथील एका वृद्धाला साडेसहा लाख रुपयांना गंडविले आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून शहर सायबर क्राईम पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 2 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. विमानतळावर तुमच्या नावे पार्सल आले आहे. यामध्ये 20 पासपोर्ट, 3 क्रेडिट कार्ड व 50 ग्रॅम ड्रग्ज आहे. त्यामुळे तुमची चौकशी करावी लागणार आहे, असे सांगत सायबर गुन्हेगारांनी त्या वृद्धाशी संपर्क साधला.
युपीच्या लखनौ येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करा, असे सांगून एकाच्या हातात फोन देण्यात आला. मी सायबर क्राईम विभागातून बोलतो. तुमच्या नावे ड्रग्जचे पार्सल आले आहे, असे सांगत वृद्धाला घाबरविण्यात आले. प्रकरण मिटविण्यासाठी म्हणून या वृद्धाकडे पैशांची मागणी करण्यात आली. एकदा 3 लाख 55 हजार 500 रुपये व आणखी एकदा 2 लाख 80 हजार रुपये असे दोनवेळा भामट्यांच्या बँक खात्यात 6 लाख 35 हजार 500 रुपये जमा करण्यात आले. भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा केल्यानंतर आपण फसलो गेलो, हे संबंधित वृद्धाच्या लक्षात आले.
बेळगाव शहर सायबर क्राईम विभागात अज्ञाताविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संजीव कांबळे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. नागरिकांनी सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.
Belgaum Online Parcel Scam Drugs Order belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Online Parcel Scam Drugs Order
Belgaum Online Parcel Scam Drugs Order
Belgaum Online Parcel Scam Drugs Order
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements