बेळगाव—belgavkar : कार्यालयात सेवेवर हजर नसल्याबाबत ग्रामीण गटशिक्षणाधिकाऱ्यांसह 5 अधिकाऱ्यांना जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांनी नोटीस बजावली आहे. याबद्दल शिस्तभंग कारवाई का करू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे.
शिक्षण संयोजक आर. एम. चलवादी, क्रीडा शिक्षण पर्यवेक्षक एस. एम. बद्री, प्राथमिक विभागाचे शिक्षण संयोजक बी. एम. बडिगेर, प्रथम दर्जा साहाय्यक एम. के. गुरव तसेच गटशिक्षणाधिकारी एस. पी. दासण्णावर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी 6 फेब्रुवारी रोजी ग्रामीण गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला अचानक भेट दिली.
त्यावेळी कार्यालयात कुणीही नसल्याचे आढळले. सेवेसाठी नियुक्ती केलेले ठिकाण सोडून काहीजण इतरत्र असल्याचे समजले, तर काहीजणांनी परवानगीविनाच रजा घेतल्याची माहिती देण्यात आली. केवळ हजेरीपुरते येणे, फायली निकाली काढण्यात दिरंगाई, लोकांची कामे करण्याकडे दुर्लक्षपणा केल्याचे पाहणीवेळी दिसून आले. याविषयी तीन दिवसांत लेखी उत्तर देण्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे.
Belgaum Notice to 5 officers absent at work belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Notice to 5 officers absent at work
Belgaum Notice to 5 officers absent at work
Belgaum Notice to 5 officers absent at work
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310