बेळगाव—belgavkar : निपाणी : येथील राष्ट्रीय महामार्गावरील बिडी कारखान्यानजीक राष्ट्रीय महामार्ग सहा पदरीकरणाचे काम करताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. राजेश वुराव (वय 28 रा. पश्चिम बंगाल) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद निपाणी शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.
अपघाताबाबत अधिक माहिती अशी, तीस बिडी कारखान्यानजीक राष्ट्रीय महामार्ग सहा पदरीकरणासाठी लागणाऱ्या साहित्य निर्मितीचा प्रकल्प आहे. येथे राजेश हा सकाळी ट्रकमध्ये मशिनरीच्या साह्याने साहित्य चढविणे, उतरण्याचे काम करीत होता. यावेळी हायड्रोलिक मशीन आणि पाईपचा आधार घेण्यात आला होता.
दरम्यान मशीन ऑपरेटरच्या दुर्लक्षामुळे वरून गेलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने हायड्रोलिक पाईप मधून विजेचा धक्का राजेशला बसला. यात तो जागीच ठार झाला. महात्मा गांधी रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी निपाणी शहर पोलिसात फिर्यादी देण्यात आली आहे.
Belgaum Nipani NH4 Worker dies electric shock
Belgaum Nipani Worker dies due to electric shock belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum Nipani NH4 Worker dies electric shock
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements