बेळगाव—belgavkar : मुतग्याहून बसरीकट्टी येथील महालक्ष्मी यात्रेसाठी संपर्क रस्त्यावरून जाताना नवीन रस्त्याचा अंदाज न आल्याने शिंदोळीजवळ गटारीत पडून झालेल्या अपघातात मुतग्याचा तरुण जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या सुमारास घडली असून मंगळवारी सकाळी उघडकीस आली. शिवजयंती उत्सवाची मिरवणूक संपवून सोमवारी रात्री उशिरा बसरीकट्टी महालक्ष्मी यात्रेसाठी जाताना हा अपघात घडला. शाम नागाप्पा केदार (वय 42, राहणार व्यंकटेशनगर, मुतगा) असे मयत तरुणाचे नाव आहे.
सोमवारी रात्री शाम केदार हा गावातील शिवजयंती मिरवणूक सपल्यानंतर बसरीकट्टी येथील यात्रेसाठी चालला होता. रात्री उशीर फार झाला असतानाही कुटुंबीयांचे न ऐकता दुचाकी घेऊन बसरीकट्टीकडे निघाला. अलीकडेच श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बसरीकट्टी-मुतगा असा नवीन संपर्क रस्ता बनविण्यात आला आहे. मुतगा गावानजीक असलेल्या एका लेआऊटमधून पुढे बसरीकट्टी शिवारांमधून हा रस्ता गावाला जाऊन पोहोचतो. या रस्त्यावरून जाताना लेआऊटमधील रस्त्याचा अंदाज न आल्याने तो सरळ रस्त्याने पुढे गेला व रस्ता संपल्यानंतर असलेल्या गटारीमध्ये दुचाकी घेऊन खाली कोसळला. यावेळी रस्त्यावर जोरात डोके आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मयत शाम केदार हा मुतगा येथील वायुदल केंद्रातील मेसमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होता. तो घरचा कर्ता पुरुष होता. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. शाम केदार हा उत्कृष्ट गोलंदाज म्हणूनही प्रसिद्ध होता. त्याने अनेक क्रिकेट स्पर्धाही गाजवल्या होत्या. त्याच्या निधनाने पूर्वभागातील क्रिकेटप्रेमींतून व ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मारीहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. श्याम केदार यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा व दोन भाऊ असा परिवार आहे.
Belgaum Mutga Youth dies bike accident Yatra belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Mutga Youth dies bike accident Yatra
Belgaum Mutga Youth dies bike accident Yatra
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements