बेळगाव—belgavkar : लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे नगरचे राजकीय वातावरण चांगलंच तापत असल्याचं दिसून येतंय. अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने जागा वाटपाबाबत सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू आहे. अशातच, लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असे विधान परिषद सदस्य माजी खासदार (चिकोडी-सदलगा) प्रकाश हुक्केरी यांनी केलयं.
मागच्या वेळी मी मंत्री असताना लोकसभा निवडणूक जिंकली आणि खासदार झाल्यामुळे मंत्रीपद गमावले. आता मी विधानसभेचा सदस्य आहे. आता मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. चिक्कोडी तालुक्यातील केरुर गावात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शिक्षकांच्या सेवेसाठी मला शिक्षकांनी विधान परिषद सदस्य म्हणून निवडून दिले आहे. माझा अजून 5 वर्षांचा कार्यकाळ आहे. शिक्षकांच्या अनेक मागण्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी मला 5 वर्षांची गरज आहे.
सिद्धरामय्या यांनी लोकसभा निवडणुकीत मला उमेदवारी दिली, तर मी लढणार नाही. हायकमांडने कितीही दबाव आणला तरी मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे प्रकाश हुक्केरी यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेचे सदस्य म्हणूनचा कार्य सुरू ठेवणार आहे (Belgaum MLC Prakash Hukkeri Loksabha).
Belgaum MLC Prakash Hukkeri Loksabha belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum MLC Prakash Hukkeri Loksabha
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements