बेळगाव—belgavkar : महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक दोन दिवसांवर आली आहे. महापौरपदासाठी आरक्षणित गटातील दोन्ही नगरसेविका भाजपकडेच असल्यामुळे महापौर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तर उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. माळवत्या महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांचा कार्यकाळ 5 फेब्रुवारी रोजी संपला. त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत काळजीवाहू महापौर म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे.
22 व्या महापौरपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला वर्गासाठी आहे. या पदासाठी प्रभाग 17 च्या सविता कांबळे आणि प्रभाग 35 च्या लक्ष्मी राठोड यांच्यात चुरस आहे. संपूर्ण सभागृहात या दोनच नगरसेविका पात्र आहेत आणि त्या दोघीही भाजपच्याच आहेत. त्यामुळे भाजपचाचं महापौर होणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल. विरोधी काँग्रेस आणि अपक्षांकडे महापौरपदासाठी पात्र नगरसेविका नाही.
उपमहापौरपद खुल्या वर्गासाठी आहे. या पदासाठी भाजपकडून दोघांत चुरस आहे. काँग्रेसकडूनही काही जण इच्छुक आहे. त्यामुळे या पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपची ताकद अधिक असल्यामुळे भाजपच विजयी होण्याची शक्यता आहे.
15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे. उमेदवारी अर्ज भरणा, छानणी, माघार आणि त्यानंतर गरज भासल्यास हात उंचावून मतदान घेण्यात येणार आहे. अन्यथा बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात येणार आहे. प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टेण्णावर हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहाणार आहेत.
Belgaum Mayor election likely to be Unopposed belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Mayor election likely to be Unopposed
Belgaum Mayor election likely to be Unopposed
Belgaum Mayor election likely to be Unopposed
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements