बेळगाव—belgavkar : कर्नाटक राज्यात विस्ताराने दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी गेल्या तीन दशकांपासून होत आहे. योग्य प्रशासनाच्या दृष्टीने जिल्ह्याचे त्रिभाजन करण्याचा विचार सरकार करत आहे. याविषयी प्रादेशिक आयुक्तांकडे माहिती मागवण्यात आली आहे.
जिल्हा फोडून बेळगाव, चिकोडी, गोकाक असे त्रिभाजन करण्यात येणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. गेल्या तीन दशकांपासून वेळोवेळी याविषयी आंदोलने करण्यात आली आहेत; पण अद्यापही त्यावर निर्णय घेतलेला नाही. विद्यमान काँग्रेस सरकारने जिल्हा विभाजनावर लोकांची मते जाणून घेण्यासाठी अहवाल मागवला आहे. विविध संघटनांनी आतापर्यंत दिलेल्या निवेदनांचा विचार सरकारने केला आहे. नवा जिल्हा, तालुका, पायाभूत सुविधा, भौगोलिक विस्तार, आवश्यकता, शहर आणि गावांपासूनचे अंतर यांसह विविध माहिती अहवालात देण्यात येणार आहे.
विस्ताराने राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून बेळगावचा उल्लेख केला जातो. येथे असणारे उपविभाग, तालुका, विभाग यांच्यातील शहरापासूनचे अंतर, जनतेला सामोरे जावे लागत असलेल्या रोजच्या समस्या, नवा जिल्हा, तालुका स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारी लोकसंख्या, गाव, भौगोलिक विस्तार, ग्रामपंचायत, शहर स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती देण्यात यावी. बेळगाव, चिकोडी, गोकाक, अथणी, बैलहोंगल यापैकी जिल्ह्याचा दर्जा कोणाला द्यावा, या तालुक्यांतील आकडेवारी अहवालात नमूद करण्यात येणार आहे.
बेळगाव जिल्ह्याचे विभाजना करण्याची मागणी 1997 च्या आधीपासून सुरु आहे. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाविषयी लोकांची मागणी काय आहे, याचा अहवाल देण्याची सूचना सरकारने प्रादेशिक आयुक्तांना केली आहे. आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाकडे याविषयीची माहिती मागवली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल दिला जाईल.
– विजयकुमार होनकेरी, निवासी जिल्हाधिकारी
Belgaum may be divided into 3 districts belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum may be divided into 3 districts
Belgaum may be divided into 3 districts
Belgaum may be divided into 3 districts
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements