शाळांवरील मराठी फलकांवरही आता कर्नाटकातील लोकप्रतिनिधींची वक्रदृष्टी
बेळगाव—belgavkar : सीमाभागातील मराठी शाळांवरील मराठी फलकांवरही आता कर्नाटकातील लोकप्रतिनिधींची वक्रदृष्टी पडली आहे. मराठी शाळांवर केवळ शंभर टक्के मराठी भाषेतच फलक असल्याची तक्रार भाजपचे विधानपरिषद सदस्य साबण्णा तळवार यांनी मंगळवारी केली. त्याला जिल्हा पालकमंत्री तथा सावर्जनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी उत्तर दिले असून, मराठी शाळांवरील फलक 50 टक्के मराठी व 50 टक्के कन्नड भाषेत असल्याची माहितीही दिली. बेळगाव जिल्ह्यातील सर्व मराठी शाळांमध्येच अशी स्थिती आहे. कन्नड शाळेतील फलक हे शंभर टक्के कन्नड भाषेतच असल्याचेही मंत्री जारकीहोळी म्हणाले.
70 च्या दशकात जी स्थिती होती, ती आता बेळगाव जिल्ह्यात नाही. बेळगावात कन्नड बोलणारे मराठीही बोलतात, तर मराठी बोलणारे कन्नडही बोलतात. भाषेबाबत भेदभाव असल्याची स्थिती जिल्ह्यात नाही. बेळगावची तुलना बंगळूरसोबत करणे योग्य नाही. बंगळूर व बेळगावमधील स्थिती वेगळी आहे. बंगळूरमधील अनेकांना कन्नड येत नाही. पण, बेळगावातील नागरिकांना मराठी व कन्नड दोन्ही भाषा येतात. मराठा वेगळे व मराठी भाषिक वेगळे, जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमातीच्या काही नागरिकांनाही कन्नड भाषा येत नाही. त्यांना मराठी भाषिक असे संबोधले जाते. निपाणीतही संपूर्ण मराठी आहे, त्याचा उल्लेखही चर्चेत झाला आहे. फलकांवर कन्नड नाही, असे सांगता येत नाही. खानापूरमध्ये मराठीचे प्रमाण जास्त असल्यामुळे तेथे मराठीचा प्रभाव आहे. कन्नड फलकांसाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, बेळगाव जिल्ह्यात भाषेची समस्या नाही, असे पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले.
साबण्णा तळवार हे भाजपचे विधानपरिषद सदस्य आहेत. बेळगाव शहरातील मतदार यादीत त्यांचे नाव असल्यामुळे सीमाप्रश्न, भाषावाद याबाबतची माहिती त्यांना आहे. गेल्या काही वर्षांत मराठी शाळांवरही कन्नड फलकांची सक्ती करण्यात आली आहे. बहुतेक सर्व मराठी शाळांवर मराठी सोबतच कन्नड फलकही लावण्यात आले आहेत. तरीही मराठी शाळांवर शंभर टक्के मराठी फलक असल्याची तळवार यांची तक्रार आहे.
शाळांसंदर्भातील मागणीबाबत आश्चर्य : तळवार हे बेळगाव महापालिकेचे पदसिद्ध सदस्य आहेत. बेळगाव महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपचे बहुतेक नगरसेवक मराठी भाषिक आहेत. बेळगाव दक्षिणचे भाजपचे आमदार अभय पाटील अनेक जाहीर कार्यक्रमात मराठी भाषेत बोलतात. त्यांच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर केला जातो. महापालिकेच्या बैठकीत आमदार व नगरसेवक मराठी भाषेत बोलतात. कन्नड फलकांची सक्ती व्यापारी आस्थापनांसाठी केली जात आहे. त्याबाबतचे विधेयकही या अधिवेशनात मांडण्यात आले आहे; पण व्यापारी आस्थापनांसोबत आता मराठी शाळांमध्येही कन्नड फलकांची सक्ती करण्याची मागणी होत आहे.
Belgaum Marathi School board MLA Talwar Sabanna belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Marathi School board MLA Talwar Sabanna
Belgaum Marathi School board MLA Talwar Sabanna
Belgaum Marathi School board MLA Talwar Sabanna
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements