बेळगाव—belgavkar : मंथन कल्चरल & सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे सुमारे 35 वर्षांपासून सुरू असलेले वाचनालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी झालेल्या वाचक संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, सभासद व वाचकांना अर्ध्या किमतीत पुस्तके देण्याचा निर्णय झाला आहे. पुस्तके खराब करण्यापेक्षा वाचकांपर्यंत पोहचावीत या उद्देशाने अर्ध्या किमतीत पुस्तके देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे 1200 पुस्तकांचे भांडार वाचनालयाकडे आहे.
मंथन सोसायटीतर्फे बेळगावात मराठी भाषेचे जतन करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मंथनकडून बेळगावात मराठी साहित्य संमेलनही पार पडते. यंदाही ते संमेलन 11 फेब्रुवारीला होणार आहे. तसेच गत 35 वर्षांपासून हिंदवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात मंथनचे वाचनालय सुरू होते. सुरुवातीला या वाचनालयाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, मंथनतर्फे फक्त मंगळवार व शुक्रवार दोनच दिवस सायंकाळी 5 ते 7 या वेळेत वाचनालय सुरू केले जात होते. त्यामुळे प्रतिसादही कमी मिळाला.
वाचक संख्या वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र, हिंदवाडी परिसरात वाचनालय असल्यामुळे म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. बेळगाव शहरात अनेक मराठी वाचनालये आहेत जी वाचनालये दिवसभर सुरू असतात. जेथे पुस्तकांचीही देवाणघेवाण होते. मात्र, मंथनचे वाचनालय दोनच दिवस सुरू असल्याने वाचक संख्याही कमी झाली होती. वाचनालयाला अनेक मान्यवरांनी पुस्तके दिली होती. अनेक महत्त्वाची 99 टक्के मराठी व इतर भाषेतील पुस्तके वाचनालयात आहेत. सभासदांना पुस्तके घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच 11 रोजी होणाऱ्या संमेलनातही याचा स्टॉल मांडण्यात येणार आहे. त्यानंतर शहरातील मराठी वाचनालयाला पुस्तके दिली जाणार आहेत. वाचकप्रेमींपर्यंत पुस्तके पोहचावीत हा उद्देश आहे.
Belgaum Manthan Library Closed Book Sell belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Manthan Library Closed Book Sell
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310