बेळगाव-चिक्कोडी belgavkar मांजरी : राष्ट्रीय पक्षी असलेले तब्बल 11 मोर (Peacock) मृत होऊन पडल्याची घटना मांजरी (ता. चिक्कोडी) येथे कृष्णा काठावर शुक्रवारी उघडकीस आली. याची वनखात्याच्या (Forest Department) अधिकाऱ्यांनी गंभीरपणे दखल घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
याबाबत माहिती अशी, मांजरी येथील कृष्णा काठावर (शुक्रवार) दुपारी काही नागरिकांना काही मोर मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती वनखात्याला दिली. वनअधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात शोध घेतला असता तब्बल ११ मोर मृत झाल्याचे आढळून आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याची माहिती घेण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, मृत मोर सापडल्याची बातमी पसरल्यानंतर या भागात लोकांनी गर्दी केली होती. वेगवेगळी चर्चा सुरू झाली. या मोरांना विषारी कडधान्य घातल्याचा संशय आहे; तर रासायनिक खते खाऊन हे मृत झाले असावेत, असे काहींचे मत आहे. याबाबत चिक्कोडीचे वनअधिकारी (Forest Officer) प्रशांत गौराणी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, विषारी धान्य खाल्ल्याने हे मोर मृत झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर याबाबत काही ठोस सांगता येईल. हे धान्य कोणी खायला घातले त्याचा तपास होईल. याबाबत गुन्हा दाखल केला जात आहे. लवकर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल.
belgaum manjari 11 peacock dies krishna river chikodi
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements