बेळगाव—belgavkar : कर्नाटक राज्य काँग्रेसने लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली असून संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. जिंकण्याच्या निकषावर राज्यातील 28 लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची यादी केली असून बेळगावातून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या नावांचा समावेश आहे.
लोकसभेच्या बेळगाव मतदारसंघातील उमेदवारीसाठी पूत्र मृणाल हेब्बाळकर इच्छुक आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविण्यात येईल. मात्र, पक्षाने अन्य कोणताही उमेदवार दिला तरी त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
त्या म्हणाल्या, काँग्रेसची एक शिस्तप्रिय शिपाई म्हणून मी कार्यरत आहे. मृणाल यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे. ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवण्यात येईल. याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेणार असून त्याला मी बांधील असेन, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील किमान 20 लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळविण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांनी केला आहे. यासाठी विजयाचे निकष लावून संभाव्य उमेदवारांची यादी अंतिम केली आहे. पालकमंत्री, जिल्ह्यातील नेते आणि पक्ष निरीक्षक यांच्याकडून संभाव्य उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये मागील लोकसभा निवडणुकीतील चुका टाळण्याचा प्रयत्न केला आहे. संभाव्य यादीतील उमेदवारांबाबत प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली. यादीबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह प्रमुख नेते चर्चा करणार आहेत. त्यांच्यानंतर अंतिम यादी मंजुरीसाठी अ. भा. काँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात येणार आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात काँग्रेसच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत अंतिम उमेदवारांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
Belgaum Loksabha Laxmi Hebbalkar on Son belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Loksabha Laxmi Hebbalkar on Son
Belgaum Loksabha Laxmi Hebbalkar on Son
Belgaum Loksabha Laxmi Hebbalkar on Son
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements