माजी मुख्यमंत्री स्वगृही परतणार?
Belgaum Loksabha
बेळगाव—belgavkar : Loksabha Election : गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपचा (BJP) त्याग करून काँग्रेसमध्ये (Congress) दाखल झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) स्वगृही परतणार असल्याची चर्चा रंगली आहे. शेट्टर यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी भाजप नेत्यांनीच पुढाकार घेतल्याचीही चर्चा सुरू आहे. शेट्टर यांची मनधरणी करण्यासाठी भाजप नेत्यांची एक टीम पुढे आली आहे.
शेट्टर यांना विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी डावलल्याने त्यांनी बंड केले. अखेर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, त्यांच्या प्रतिमेचा इतर मतदारसंघांवरही परिणाम होऊन भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. अलीकडेच कॉंग्रेसने त्यांना विधान परिषदेवर निवडून दिले आहे.
शेट्टर हे बेळगावचे दिवंगत माजी खासदार सुरेश अंगडी यांचे जवळचे नातलग आहेत. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले आहे. त्यामुळे मतदारसंघाची त्यांना चांगली माहिती असून, मतदारांशी चांगला संपर्कही आहे. शिवाय बेळगाव लोकसभा क्षेत्रातील लिंगायत मतदारांवर त्याचा प्रभाव पडू शकतो, असे भाजपचे मत आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आणि बसवराज बोम्मई यांनी शेट्टर यांना पुन्हा भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. दोन दिवसांपूर्वी बंगळूरमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीत त्यावर चर्चा झाल्याचे समजते.
शेट्टर यांनीही आपण कोणत्याही कारणास्तव भाजपमध्ये जाणार नसून, काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगितले. मात्र, लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतसे राजकारणातील हालचालींना पुन्हा एकदा उधाण आले आहे. बी. वाय. विजयेंद्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर भाजपमध्ये वातावरण बदलले आहे. पक्ष सोडलेल्यांना पुन्हा पक्षात आणावे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Belgaum Loksabha Jagdish Shettar Election belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum Loksabha Jagdish Shettar Election belgavkar
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements