बेळगाव—belgavkar : खानापूर : गणेबैल व हत्तरगुंजीजवळील बांबू व्यापाऱ्याकडून मालासह पकडून खंडणीबहाद्दर टोळक्याने धमकी देऊन त्यांच्याकडून ₹ 2 लाखांची खंडणीची मागणी केली. शिवाय त्यांच्याकडून 40 हजारांची रोकड हिसकावून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खानापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. खानापूर तालुक्यातील बनावट YouTube चॅनलचालक, तोतया पत्रकारांसह 5 जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली.
शशिधर चंद्राप्पा नायक (रा. गांधीनगर, खानापूर), बाळाप्पा उर्फ शरद कलाप्पा व्हन्ननायक (रा. नंदगड), शशिकांत तळवार (सुरापूर), रवी बाळाप्पा मादर (मुडेवाडी), पांडुरंग बसाप्पा गुळणावर या तोतया पत्रकारांचा यात समावेश आहे. याबाबत माहिती अशी, बांबू व्यापारी चंद्रकांत मेदार यांनी सरकारी बांबू तोडण्यासाठी कंत्राट घेतले होते. हत्तरगुंजीजवळील वनखात्याच्या विभागातील बांबू तोडत असताना संबंधित आरोपींनी बांबू तोडण्यासाठी आवश्यक परवाना आहे का? वाहतूक करण्यासाठी पास आहेत का? याची विचारणा केली. त्यावेळी मेदार यांनी त्यांना 200 बांबूचा पास आहे. बाकीचापास दोन दिवसांनी मिळणार आहे, असे सांगितले.
त्यानंतर संशयित आरोपींनी आम्ही पत्रकार आहोत. तुमच्याबाबतचे सगळे काळाबाजार व्हायरल करतो. नाहीतर रक्कम द्या, अशी धमकी दिली. यानंतर श्री. मेदार यांनी ट्रॅक्टर चालकाच्या खात्यावर ₹ 40000 जमा केले. ट्रॅक्टरचालक अल्लोळकर यांनी खानापुरात येऊन 40000 ₹ आरोपींना दिले. याबाबत मेदार यांनी खानापूर पोलिसांत संबंधितांविरोधात फिर्याद दाखल केली. खानापूरचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ नायक, गुन्हे विभागाचे उपनिरीक्षक बबली यांनी तपास करून या चॅनेल चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तोतया पत्रकारांच्या मुसक्या आवळल्या.
Belgaum Khanapur 5 arrested reporter blackmail belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum Khanapur 5 arrested reporter blackmail
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements