Karnataka assembly passes bill for 60% Kannada on signboards
बेळगाव—belgavkar : आस्थापने, उद्योग, व्यवसाय व दुकानाच्या पाट्यांवर 60 टक्के जागेत कन्नड भाषेचा वापर न केल्यास अशा आस्थापनांचा परवाना रद्द करण्याचा इशारा देऊन विधानसभेने कन्नड अनिवार्य विधेयकाला मंजुरी दिली. आता हे विधेयक विधान परिषदेत पाठवण्यात येणार असून, तिथे मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल (bill mandating 60% Kannada on signboards). कन्नड भाषा सर्वसमावेशक विकास (सुधारणा) विधेयक व्यावसायिक, औद्योगिक आणि व्यावसायिक उपक्रम, ट्रस्ट, समुपदेशन केंद्रे, रुग्णालये, प्रयोगशाळा, मनोरंजन केंद्रे आणि हॉटेल्स यांच्या पाट्यांवर कन्नड भाषेचा 60 टक्के जागेवर वापर अनिवार्य बनवणार आहे (Kannada Language Comprehensive Development (Amendment) Bill, 2024).
सध्या कायद्यानुसार टक्केवारीचा नियम नाही, पण पाट्यांच्या वरच्या अर्ध्या भागात कन्नड अक्षरे वापरण्याची आवश्यकता बनणार आहे. कन्नड आणि सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी म्हणाले की, सरकार कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियम तयार करत आहे. नियमांमध्ये आम्ही परवाने रद्द करण्याची तरतूद करू. परवाने रद्द झाल्यावरच आस्थापनांना कन्नड वापराचे महत्त्व समजेल. नवीन परवाने जारी करताना किंवा विद्यमान नूतनीकरणाच्यावेळी सरकार प्रथम खात्री करेल की, कन्नडमध्ये पाट्या आहेत की नाही.
तंगडगी म्हणाले की, सरकार नियमांमध्ये दंडाची देखील तरतूद करणार आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार कृतीदल तयार करेल. प्रत्येक जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली कृती दल असेल. कन्नड कमी वापर हे केवळ बंगळूरमध्ये आहे. राज्याच्या इतर भागात लोक फक्त कन्नड बोलतात. बंगळूरमध्ये, सरकार प्रत्येक आठ नगरपालिका झोनमध्ये समित्या तयार करणार आहे. या समित्यांना कन्नड भाषेतून तक्रारी प्राप्त होतील. आम्ही यासाठी ‘कांगावलू’ नावाचे App देखील आणत आहोत.
विधेयकाचे स्वागत करताना विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी आर्थिक दंडावर भर दिला. ही एकमेव गोष्ट आहे जी कार्य करेल. अन्यथा, आस्थापने न्यायालयात जातील. भाजपचे ज्येष्ठ आमदार एस. सुरेशकुमार म्हणाले की, कन्नडसाठी कायदा करणे हे हेच वेदनादायक आहे. लोकांना बंगळूरबद्दल प्रेम नाही. त्यांना ते आपले शहर वाटत नाही. परंतु त्यांचे ग्राहक कन्नडिग आहेत. विरोधी पक्षाचे उपनेते अरविंद बेल्लद यांनी 60 टक्के जागेत कन्नड भाषेबाबत स्पष्टता मागितली. इंग्रजीची 6 अक्षरे कन्नडमध्ये 3 झाल्यावर ते कसे चालेल? मग 60 टक्के जागा कशी मोजली जाईल, हे स्पष्ट केले पाहिजे. अन्यथा अंमलबजावणीत अडचणी येतील.
Belgaum Karnataka bill for Kannada on signboards belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Karnataka bill for Kannada on signboards
Belgaum Karnataka bill for Kannada on signboards
Belgaum Karnataka bill for Kannada on signboards
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements