बेळगाव—belgavkar : बेळगाव महापालिकेकडून शहरात कन्नडसक्ती सुरु करण्यात आली आहे. आस्थापनांच्या पाट्यांवर 60 टक्के जागेत कन्नड मजकूर लिहिणे तसेच ‘बेळगाव ‘ऐवजी ‘बेळगावी’ असा उल्लेख करण्यासाठी 3 दिवसांची मुदत दिली आहे. बुधवारी दिवसभरात शहरातील 1296 आस्थापनांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. अनेक आस्थापनांवरील फलक महापालिकेकडूनच हटवण्यात आले आहेत. पाट्यांवर (board) 60 टक्के कन्नडसक्ती केवळ व्यापारी आस्थापनांनाच करण्यात आलेली नाही. औद्योगिक आस्थापने, हॉस्पिटल्स, समुपदेशन केंद्र, प्रयोगशाळा, मनोरंजन केंद्र, हॉटेल्स यांनाही ही सक्ती आहे.
बुधवारी महापालिकेचे बहुतेक सर्व अधिकारी व कर्मचारी शहरात फिरून आस्थापनांना नोटीस बजावत होते. तीन दिवसांत सर्वत्र 60 टक्के कन्नड आणि ‘बेळगावी’ असा उल्लेख केला नाही, तर महापालिकेकडून फलक हटविला जाईल. तसेच त्याचा खर्च दंड स्वरूपात वसूल केला जाईल, असा इशारा दिला आहे. फलक हटविताना काही आगळीक झाल्यास त्याला महापालिका जबाबदार असणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता तीन दिवसांनंतर महापालिकेकडून प्रत्यक्षात कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे. एकीकडे महापालिकेकडून नोटीस बजावली जात असताना दुसरीकडे कन्नड संघटनांनी स्वतः काही आस्थापनांचे मराठी व इंग्रजी भाषेतील फलक हटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काकतीवेस परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात 60 टक्के कन्नड सक्तीबाबतचे विधेयक मांडण्यात आले होते. ते विधेयक दोन्ही सभागृहांत मंजूर झाले. त्यामुळे कन्नडसक्तीचा निर्णय 26 फेब्रुवारी रोजी अधिसूचित करण्यात आला. त्याची अंमलबजावणी आता महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे; पण बुधवारी एकाच वेळी संपूर्ण शहरात महापालिकेने अंमलबजावणी सुरु केली. एकाच वेळी सर्व प्रभागांमध्ये पथके पाठविली. आरोग्य, महसूल व बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यामुळे बुधवारी शहरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले.
कन्नडसक्ती आदेशाची अंमलबजावणी बुधवारी सकाळी सुरु करण्याचा आदेश आयुक्त पी. एन. लोकेश यांनी मंगळवारी रात्रीच दिला होता. त्यानुसार सकाळपासून महापालिका कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रात नोटीस बजावत फिरत होते. जानेवारी महिन्यात महापालिकेकडून दोन हजारांहून अधिक आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Belgaum Kannada Board 60 percentage Kannada belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Kannada Board 60 percentage Kannada. Belgaum Kannada Board 60 percentage Kannada
Belgaum Kannada Board 60 percentage Kannada
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements