बेळगाव—belgavkar : हुक्केरी : सोशल मीडियाचा अतिवापर व गतिमान जीवनशैलीमुळे पालकांचे पाल्याकडे होणारे दुर्लक्ष, पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होणारा संशय, सुसंवादाचा अभाव व व्यसनाधीनता या कारणांमुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्यातून घटस्फोट, पळून जाणे, आत्महत्या यांसारखे प्रकार घडू लागले आहेत. ते टाळण्यासाठी पालकांनी पाल्यांवर लक्ष ठेवणे व त्यांना वेळ देणे गरजेचे आहे. तसेच नातेसंबंधात संशय निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहित महिला, तरुणींना मेसेज पाठवले जातात. या माध्यमातून प्रामुख्याने पतिपत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊन संशयाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे कौटुंबिक कलह निर्माण झाल्याने विवाहित महिला पळून जाण्याचे व घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढत आहे. कौटुंबिक कलह सहन न झाल्याने काही महिला अथवा पुरुष आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. संशय, सोशल मीडिया व सुसंवादाच्या अभावामुळे अशा घटनांत वाढ झाली आहे.
एक विवाहित महिला प्रियकरासमवेत पळून गेल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील जिनराळ गावात घडली आहे. त्यामुळे चिडलेल्या पतीने तसेच सासरच्या लोकांनी प्रियकराच्या घराची नासधूस केली. जिनराळ गावचा रहिवाशी असलेला लगमण्णाा वालीकर याच्यासमवेत विवाहित महिलेने पलायन केले. विवाहितेला दोन मुलेही आहेत. पलायनाची माहिती महिलेच्या घरी कळल्यानंतर पती तसेच सासरच्या लोकांनी लगमण्णाच्या घरावर हल्लाबोल केला. तसेच घरात असलेल्या सर्व साहित्याची नासधूस केली. घरावर दगडफेक केल्याची तक्रार लगमण्णाच्या आईने केली आहे. ती म्हणाली, या प्रकरणाबाबत मंगळवारी गावातील ज्येष्ठांच्या समोर समेट करण्यात आला होता. मात्र मंगळवारी रात्रीच 8 च्या दरम्यान एका गटाने हातात कुन्हाड, खुरपे, काठ्या घेऊन हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यांना पाहून आम्ही सुरक्षित ठिकाणी गेलो.
घरात मी, आत्या व आणखी एक मुलगा थोडक्यातच बचावलो. घरावर हल्ला झाल्यानंतर स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पण वेळेवर पोलिस आले नाहीत. यामुळे आमच्या घरातील एकही वस्तू शिल्लक राहिली नाही. तसेच घरातील सोने, चांदीची दागिने व पैसे लुटून नेण्यात आले आहेत. याविषयी यमकनमर्डी पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. सद्या घटनेविषयी आलेल्या तक्रारीनुसार पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला असून, तपास सुरू आहे.
Belgaum Hukkeri Jirnal Woman eloped love affair belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Hukkeri Jirnal Woman eloped love affair
Belgaum Hukkeri Jirnal Woman eloped love affair
Belgaum Hukkeri Jirnal Woman eloped love affair
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements