बेळगाव—belgavkar : खानापूर तालुक्यातील लक्केबैल येथे शॉर्टसर्किटने एका घराला आग लागून घरातील फर्निचर व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी 7 वाजता घडली. या आगीत ₹ 7 लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. खानापूर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या बाबतची माहिती अशी, लक्केबैल येथील चंद्रकांत सदाप्पा चलवादी यांच्या घरात शॉर्टसर्किट झाल्याने बुधवारी आग लागली.
यावेळी चंद्रकांत हे आपल्या कुटुंबासमवेत शेतावर वीटभट्टीच्या कामावर होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. शॉर्टसर्किट होऊन आतल्या आत आग धुमसत होती. काही वेळानंतर धुराचे लोट बाहेर आल्याने शेजारील लोकांना आग लागल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती चंद्रकांत यांना देण्यात आली. यावेळी चंद्रकांत हे आपल्या कुटुंबासमवेत या ठिकाणी आल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. तसेच खानापूर अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली.
खानापूर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन आग पूर्णपणे आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत चंद्रकांत यांच्या घरातील फर्निचर, टीव्ही, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे त्यांचे अंदाजे 7 लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. आगीमुळे चंद्रकांत चलवादी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Belgaum House fire at Lakkebail Khanapur due to short circuit belgavkar belgaum
House fire at Lakkebail due to short circuit Belgaum
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements