बेळगाव—belgavkar : खानापूर : हलशीवाडी (ता. खानापूर) येथे शनिवारी सायंकाळी शेतवडीत वाघाच्या बछड्याचे शेतकऱ्यांना दर्शन झाले. बछडा असल्याचा दुजोरा वनविभागाने दिला आहे. वन विभागाला याची माहिती समजताच रविवारी सकाळी मेरडा क्षेत्रातील वनाधिकारी एन. जी. हिरेमठ व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून ठशावरून पट्टेरी वाघच असल्याचे जाहीर केले.
याबाबत माहिती अशी, हलशीवाडीपासून जवळच वायंगण शेतवडीत शनिवारी वाघसदृश प्राणी निलेश देसाई यांना दिसला. त्यांनी झुडपामागून या वाघाची छबी मोबाईलमध्ये टिपली. याचवेळी शेतकरी, वहेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करताच वाघाने येथून धूम ठोकली. हा वाघ नसून तो वाघाचा बछडा असल्याचे वनविभाने स्पष्ट केले आहे. वनअधिकारी हिरेमठ म्हणाले, फोटो व ठशावरून संबंधित प्राणी वाघ आहे. पाण्यासाठी त्याची भटकंती सुरू असल्याचा अंदाज आहे.
शेजारीच गुंडपी जंगल असून हे जंगल नागरगाळी जंगलाला मिळाले आहे. सध्या उष्मा वाढला असून, जंगलातील पाणीसाठे कमी झाले आहेत. हलशीवाडी परिसरात सात तलाव व नाल्यात मुबलक पाणी असल्याने वन्यप्राणी येथे येत आहेत. रात्री पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांनी मशाल पेटवून काम करावे. वन्यप्राणी दिसल्यास फोटो अथवा सेल्फी न घेण्याचे आवाहन त्यांनी केले. रात्री वन कर्मचाऱ्यांची गस्त घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात मुबलक पाणी असल्याने पाण्याच्या शोधात हा वाघाचा बछडा आला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यावेळी उमेश देसाई, गजानन देसाई, दत्तात्रय देसाई, खतालसाब माडीवाले व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Halashiwadi Khanapur Tiger Cub belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Halashiwadi Khanapur Tiger Cub
Belgaum Halashiwadi Khanapur Tiger Cub
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310