बेळगाव—belgavkar : अंकली येथे अंकली-रायबाग रोडवरील मेदार कुटुंबियांच्या 6 घरांना मंगळवारी रात्री आग लागली. त्यात घरे खाक होऊन सुमारे ₹ 20 लाखांवर नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, अंकली-रायबाग रोडवर मेदार समाजाची घरे आहेत. तेथे बांबू, शिड्या, बुट्ट्या अशा लाकडी व वेळूच्या वस्तूंची विक्री केली जाते. रात्री अकरानंतर एका घरातून अचानक आगीचे लोळ दिसून आले. काही क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले.
या घटनेत सागर मेदार, चिदानंद मेदार, महादेवी मेदार, महादेव मेदार, उज्वला सूर्यवंशी, सरोजा मेदार यांची घरे जळून खाक झाली. या आगीच्या घटनेत ₹ 20 लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी नागरिकांनी साहित्य बाजूला करण्याचा प्रयत्न केला. चिदानंद कोरे साखर कारखान्याच्या अग्निशमन दलास पाचारण केले. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्याने व लाकडी साहित्य असल्यामुळे आग विझविताना अनेक अडचणी आल्या. या आगीत संसारोपयोगी साहित्यासह धान्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूही जळून खाक झाल्या.
पोलिस उपाधिक्षक गोपालकृष्ण गौडा, मंडल पोलिस निरीक्षक विश्वनाथ चौगला, बी. एस. तळवार, उपनिरीक्षक के. बी. जक्कान्त्रवर, महसूल निरीक्षक आर. आय. नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेत चिदानंद मेदार यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्यासह सुमारे दोन लाख किंमतीची दुचाकी, ऊस बिलाची सुमारे 4 लाखाची रक्कम, घरातील धान्यही जळाले. त्यामुळे धास्तावलेल्या मेदार कुटुंबीयांना तहसीलदार सी. एस. कुलकर्णी यांनी दिलासा दिला.
Belgaum Fire 6 Houses in Ankali Chikodi belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Fire 6 Houses in Ankali Chikodi
Belgaum Fire 6 Houses in Ankali Chikodi
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements