बेळगाव—belgavkar : बेळगावची महापौर, उपमहापौर निवडणूक 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टेनावर यांनी सोमवारी महापौर- उपमहापौर निवडणूक वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यमान महापौर शोभा सोमनाचे व उपमहापौर रेश्मा पाटील यांचा कार्यकाळ सोमवारी पूर्ण होणार होता. त्यामुळे प्रादेशिक आयुक्त सोमवारी महापौर निवडणूक वेळापत्रक जाहीर करणार का, याबाबत उत्सुकता होती, सोमवारीच निवडणूक वेळापत्रक जाहीर करून प्रादेशिक आयुक्तांनी या विषयावरील चर्चा थांबविली आहे. महापालिकेकडून सोमवारीचं या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
महापौर निवडणुकीची नोटीस सोमवारीच नगरसेवक, तसेच अन्य मतदारांना पाठविली आहे. शिवाय महापौर व उपमहापौरपदासाठी इच्छुक असलेल्या सत्ताधारी गटातील नगरसेवकांची मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. 15 फेब्रुवारी रोजी प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापौर, उपमहापौर निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. सकाळी 9 ते 11 या वेळेत या दोन्ही पदांसाठी अर्ज स्वीकारले जातील. दुपारी एक वाजता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. आधी अर्जाची पडताळणी केली जाईल. त्यानंतर अर्ज माघारीची प्रक्रिया होईल. त्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी हात उंचावून मतदान घेतले जाईल.
बेळगावची महापौर उपमहापौर निवडणूक घेण्याबाबतचे पत्र 8 जानेवारीला महापालिकेने प्रादेशिक आयुक्तांना दिले होते. पण, पत्र मिळूनही प्रादेशिक आयुक्तांकडून महापौर, उपमहापौर निवडणूक जाहीर केली नव्हती. महापौर, उपमहापौरांचा कार्यकाळ पूर्ण होत आला तरी निवडणूक घेण्याबाबत कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणूक होईपर्यंत ती प्रक्रिया लांबणीवर पडणार का, महापालिकेत प्रशासक नियुक्त केले जाणार का, महापालिकेत ऑपरेशन हस्त राबविले जाणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. खाऊ कट्टाप्रकरणी सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांची चौकशी सुरू असल्यानेही निवडणूक घेतली जात नसल्याची चर्चा सुरू होती. पण, आता निवडणूक जाहीर झाल्याने या सर्व चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.
विद्यमान महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाळ सोमवारी पूर्ण झाला, पण पुढील महापौर व उपमहापौर निवड होईपर्यंत तेच काळजीवाहू म्हणून कामकाज करणार असल्याची माहिती महापालिकेतून देण्यात आली आहे. त्यांना महापालिकेतील आपला कक्ष, तसेच वाहन वापरता येणार आहे; पण त्यांना बैठक घेता येणार नाही. तसेच महापालिकेच्या कोणत्याही बैठकीत महापौर किंवा उपमहापौर म्हणून सहभागी होता येणार नाही. महापालिका कायदा 1976 मधील तरतुदीनुसार हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची बदली झाली असली, तरी त्यांच्या जागी अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही, त्यामुळे त्यांनी अद्याप पदभार सोडलेला नाही. महापौर निवडणूक जाहीर होताच, आयुक्त दुडगुंटी यांनी लागलीच पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. महापौर निवडणूक होईपर्यंत दुडगुंटी हेच आयुक्तपदी राहणार का, याबाबत उत्सुकता आहे.
आरक्षण असे :
महापौरपद…… अनुसूचित जाती महिला
उपमहापौरपद सामान्य
हे मतदान करणार :
58 : नगरसेवक
विधानसभा सदस्य.4
खासदार : 2
विधान परिषद सदस्य : 1
एकूण : 65
पक्षीय बलाबल :
भाजप : 35 नगरसेवक, 2 खासदार, 1 विधानसभा सदस्य, 1 विधान परिषद सदस्य. एकूण : 39
काँग्रेस : 10 नगरसेवक, 3 विधानसभा सदस्य, एकूण : 13
अपक्ष : 12 नगरसेवक
एमआयएम : 1 नगरसेवक
Belgaum Election of mayor-deputy mayor Feb belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Election of mayor-deputy mayor Feb
Belgaum Election of mayor-deputy mayor Feb
Belgaum Election of mayor-deputy mayor Feb
Belgaum Election of mayor-deputy mayor Feb
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements