बेळगाव—belgavkar : एका कैद्याने गुरुवारी न्यायालयाच्या आवारात पोलिसांना चकवा देऊन पळ काढला होता. हिंडलगा कारागृहातून जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलेला एक कैदी फरार झाला होता. पोलिसांच्या हातातून कैदी पळून गेल्याने पोलिस दलात खळबळ उडाली होती. अब्दुलगनी शब्बीर शेख असे त्याचे नाव आहे. मात्र अवघ्या चार तासात सदर आरोपीच्या पुन्हा मुसक्या आवळण्यात बागेवाडी पोलिसांना यश आले आहे.
टिळकवाडी पोलिसांनी शेख याला सुनावणीसाठी जेएमएफसी न्यायालयात आणले होते. विविध चोरीच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. आरोपीने न्यायालयाच्या आवारात पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केल्याची घटना घडली होती. त्यानंतर तो हिरेबागेवाडी येथील मुस्लिम गल्लीत बसला होता. तेव्हा बागेवाडी पोलीस स्थानकाचे पीएसआय अविनाश यरागोप्पा यांच्या नेतृत्वाखाली काही तासातच सदर आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. पीएसआय अविनाश, सहकारी नागाप्पा सुतगट्टी आणि बाबण्णा यांनी या चोरट्याला पुन्हा पकडण्यात यश मिळविले, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी दिली.
belgaum court prisoner escaped and caught
belgaum court prisoner escaped and caught
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements