बेळगाव—belgavkar : बेळगाव महानगरपालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 28 मधील पीके क्वॉर्टर्स येथे मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नगरसेवक रवी धोत्रे यांच्या बेजबाबदारपणामुळे येथील रहिवाशांना सरकारच्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. मागासवर्गीयांसाठी राखीव असणारा निधी मंगलकार्यालयासाठी नगरसेवकांनी वळविला आहे. रवी धोत्रे यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशा मागणीचे निवेदन सफाई कर्मचारी काऊलू समितीतर्फे मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांना देण्यात आले.
एससीएसटी समाजासाठी राखीव असणारा निधी नगरसेवक रवी धोत्रे यांनी आपल्या मंगलकार्यालयासाठी वळविला आहे. त्यामुळे या राखीव निधीमध्ये गैरकारभार झाला आहे. निधीचा दुरुपयोग करून घेण्यात आला आहे. यामुळे मागासवर्गीय समाजाच्या वसतीमध्ये विकासकामे रखडली आहेत. विकास कामांअभावी येथील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मागासवर्गीय वसतींमध्ये विकासकामे राबविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला आहे. समाज विरोधी असणाऱ्या नगरसेवक रवी धोत्रे यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे, अशी मागणी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Belgaum Corporator Ravi Dhotre belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
belgavkar
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements