बेळगाव—belgavkar : महात्मा गांधी नगरविकास योजनेचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. बेळगावसह 10 महापालिकांसाठी या योजनेतून तब्बल ₹ 2000 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. या निधीचे समान वाटप झाले, तर बेळगाव महापालिकेच्या वाट्याला ₹ 200 कोटी रुपये निधी येऊ शकतो. 2024-25 या आर्थिक वर्षात हा निधी मिळणार आहे. महात्मा गांधी नगरविकास योजना 2 या नावाने काँग्रेस सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
15 फेब्रुवारी रोजी झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीनंतर बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी शासनाकडून महापालिकेला निधी मिळाला नसल्याची टीका केली होती. भाजप सरकारच्या काळात महात्मा गांधी नगरविकास योजनेतून महापालिकेला 125 कोटी रुपये मिळाले होते, पण काँग्रेस सरकारकडून या योजनेतून एक रूपयाही मिळाला नसल्याची टीकाही केली होती; पण दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात या योजनेचे पुनरूज्जीवन करण्यात आले आहे.
याशिवाय बेळगावसह राज्यातील 9 ठिकाणी टाऊनशिप योजना राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. बेळगावात टाऊनशिप निर्मितीची चर्चा गेल्या 20 वर्षांपासून सुरू आहे. यावेळी तरी टाऊनशिप होणार का? हे पाहावे लागणार आहे. 2008 साली राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी नगरोत्थान योजना सुरू केली होती. त्या योजनेतून बेळगावसह राज्यातील सर्व महापालिकांसाठी प्रत्येकी 100 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी या निधीवरून बेळगावात मोठा संघर्षही झाला होता. त्यातून बेळगावच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली होती. भाजप सरकारच्या काळात दोनवेळा म्हणजे 200 कोटी रुपये निधी महापालिकेला मिळाला. 2013 साली काँग्रेस सरकार सत्तेत आल्यावरही ही योजना सुरूच ठेवण्यात आली. त्यावेळी पुन्हा 100 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. त्या 100 कोटी रुपये निधीतून शहरात फ्लायओव्हर निर्मितीची योजना होती, पण नंतर ती योजना बासनात गुंडाळण्यात आली.
Belgaum Corporation ₹ 200 crore Fund budget belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Corporation ₹ 200 crore Fund budget
Belgaum Corporation ₹ 200 crore Fund budget
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements