बेळगाव—belgavkar : चिक्कोडी : बेकायदेशीर दारू वाहतूक आणि विक्री प्रकरणातील आरोपीला 5 महिन्यांची शिक्षा आणि ₹ 25000 दंडाची शिक्षा ठोठावली. महादेव शेट्टप्पा देवरूषी (शिरगाव, ता. चिक्कोडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
चिक्कोडी येथील आरटीओ कार्यालय परिसरात बेकायदेशी दारू वाहतूक व विक्री प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत देवरूषी याला अटक केली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास केला होता. त्यानंतर न्यायालयाता दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी चिक्कोडी येथील न्यायालयात झाली. 2019 मधील प्रकरणातील निकाल देताना न्यायालयाने दोषी ठरवत देवरूषी याला वरील शिक्षा सुनावली. न्यायाधीश अशोक आर. एच. यांनी ही शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून बसवराज ओसी यांनी काम पाहिले.
Belgaum Chikodi illegal liquor sale sentenced to 5 months jail belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Chikodi illegal liquor sale sentenced to 5 months jail
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements