बेळगाव—belgavkar : बिजगर्णी-कावळेवाडी (ता. बेळगाव) गावची लक्ष्मी यात्रा 16 एप्रिलला निश्चित करण्यात आली आहे. यात्रेला अवघा दीड महिना शिल्लक असल्यामुळे गावात जोरदार तयारी सुरू झाली आहे. 9 दिवस ही यात्रा होणार आहे. 1994 नंतर 30 वर्षांनंतर यात्रा होत असल्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थ कमिटीच्या बैठका होत आहेत. लक्ष्मी यात्रेपूर्वीच गावात नव्याने उभारण्यात आलेल्या कलमेश्वर मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या मंदिराचे लोकार्पण होणार आहे. दरम्यान, 16 एप्रिल रोजी गावातील विविध देवदेवतांचे पूजन केले जाणार आहे. 17 रोजी सकाळी कलमेश्वर मंदिर आवारात महालक्ष्मीचा विवाह सोहळा होईल. यादिवशीच विविध गल्ल्यांतून मिरवणुकीद्वारे शाळेच्या आवारात असलेल्या गदगेवर लक्ष्मी विराजमान होणार आहे. गुरुवार (ता. 18) पासून ओटी भरणे व इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर बिजगर्णी गावात गटारींची स्वच्छता व नवीन गटारी बांधकामही केले जात आहे. यात्रेसाठी गावात अनेक कमिटींची रचना केली जाणार असून यात युवकांचा समावेश असेल. खेळण्याचे साहित्य मांडण्याचे ठिकाण स्वच्छ केले जात आहे. तसेच चौथरा बांधकाम देखील केले जात आहे.
पुढील चार दिवसांत रथाचे कामही हाती घेतले जाणार आहे. यात्रेनिमित्त गावातील सर्वच मंदिरांवर विद्युत रोषणाई केली जाणार आहे. तसेच कमान व दोन स्क्रीन लावल्या जाणार आहेत. ड्रोनची व्यवस्था व चोख पोलिसबंदोबस्तही असणार आहे. यात्रेदिवशी पार्किंगची अडचण येऊ नये यासाठी पार्किंगचे नियोजनकेले जात आहे. अनेकांनी घरांच्या रंगरंगोटीची कामे हाती घेतली आहेत.
Belgaum Bijagarni Kawalewadi Village Festival belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Bijagarni Kawalewadi Village Festival
Belgaum Bijagarni Kawalewadi Village Festival
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements