बेळगाव—belgavkar : कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता (17 डिसेंबर 2021). बंगळुरूमध्ये शिवमूर्तीची विटंबना झाल्यानंतर बेळगावात निर्माण झालेल्या तणावावेळी पोलिसांनी अॅड. अमर यळ्ळूरकर यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र, अॅड. यळ्ळूरकर यांच्यावरील गुन्हे उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने रद्दबातल ठरविले आहेत. सदर घटना 17 डिसेंबर 2021 मध्ये घडली होती.
त्यावेळी बेळगावच्या धर्मवीर संभाजी महाराज चौकात आंदोलन केले होते. सुमारे 150 कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी राजद्रोहासह सरकारी मालमत्तेचे नुकसान, सरकारी कामात अडथळा, खुनाचा प्रयत्न, आदी गुन्हे अनेक कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आले आहेत. त्यावेळी खडेबाजार पोलिस ठाण्यात 48, कॅम्प पोलिस ठाण्यात 120 व मार्केट पोलिस ठाण्यात 55 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यासंबंधी अॅड. अमर यळ्ळूरकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अॅड. यळ्ळूरकर यांच्यावरील खटला उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे. अॅड. यळ्ळूरकर यांचा कोणत्याही गुन्ह्यात हात नसल्यामुळे त्यांच्यावरील गुन्हे रद्दबातल ठरविण्यात आले आहेत. यासंबंधी अॅड. राम घोरपडे यांनी काम पाहिले.
Belgaum Bangalore Shivaji Maharaj Statue Adv Amar Yellurkar belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Bangalore Shivaji Maharaj Statue Adv Amar Yellurkar
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements