बेळगाव—belgavkar : कॉलेजमधील शिल्लक पगारी रजेची रक्कम देण्यासाठी लाच मागणारे उपप्राचार्य लोकायुक्त जाळ्यात सापडले आहेत. बैलहोंगलमध्ये ही कारवाई करण्यात आली. के. बी. हिरेमठ असे त्यांचे नाव असून लोकायुक्त पोलिसांनी त्यांना अटक केली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शहरातील एका नामांकीत शिक्षण संस्थेची बैलहोंगलमध्ये माध्यमिक शाळा आहे. या शाळेत रविंद्र राजाराम मदाळे हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या पगारी रजा शिल्लक असून त्याचा पगार मिळावा म्हणून त्यांनी संस्थेकडे अर्ज केला होता. पगारी रजा मिळण्यासाठी व्यवस्थापनाच्या बैठकीत ठराव व्हावा लागतो. या ठरावाची प्रत देण्यासाठी हिरेमठ यांनी एकूण मिळणाऱ्या पगारातील 25 टक्के म्हणजे 13,150 रुपयांची लाच मागितली होती. मदाळे यांनी याबाबतची तक्रार बेळगाव लोकायुक्त खात्याला दिली होती. उपप्राचार्यांना लाच घेताना लोकायुक्तने त्यांना रंगेहाथ पकडले. लोकायुक्त जिल्हा पोलिसप्रमुख हनुमंत राय, उपअधीक्षक बी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आर. एल. धर्मट्टी, उपनिरीक्षक अजीज कलादगी, उपनिरीक्षक अन्नपूर्णा हुलगूर व व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
Belgaum Bailhongal Vice-Principal caught Lokayukta belgav belagavi
belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Bailhongal Vice-Principal caught Lokayukta
Belgaum Bailhongal Vice-Principal caught Lokayukta
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements