Anna Bhagya Scheme — अन्न भाग्य योजना
5 किलो तांदळाऐवजी खात्यात प्रतिकिलो ₹ 34 रुपये
बेळगाव—belgavkar : अन्नभाग्य योजनेंतर्गत डिसेंबर 2023 मध्ये जिल्ह्यात एकूण 57 कोटी 8 लाख 30 हजार 590 रुपये अंत्योदय आणि बीपीएल शिधापत्रिका धारकांच्या खात्यात जमा केली (Anna Bhagya Scheme). एकूण 10 लाख 10 हजार 720 शिधापत्रिकाधारक आणि 34 लाख 46 हजार 835 पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली आहे (DBT). राज्य सरकारने जुलै 2023 पासून राष्ट्रीय आहार सुरक्षितता कायदा अंतर्गत पीएमजेकेवाय योजनेअंतर्गत मोफत आहार धान्य पुरवठा सुरू केला आहे.
राज्य सरकारच्या अन्नभाग्य योजनेअंतर्गत बीपीएल शिधापत्रिकाधारकांच्या प्रत्येक सदस्याला 10 किलो तांदूळ देण्याची घोषणा केली होती; परंतु तांदळाची टंचाई निर्माण झाल्याने अंत्योदय शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबांसाठी 35 किलो मोफत तांदूळ आणि बीपीएल शिधापत्रिकाधारकांच्या प्रतिसदस्यांना 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहेत. तर दरमहा उर्वरित 5 किलो तांदळाऐवजी लाभार्थ्यांच्या खात्यात प्रतिकिलो 34 रुपये दराने कुटुंबप्रमुख व्यक्तीच्या खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा करण्यात येत आहे. जुलैपासून डिसेंबर 2023 पर्यंत सुमारे सहा महिन्यांपासून ही रक्कम जमा करण्यात येत आहे.
योजनेपासून वंचित असणाऱ्यांनी लाभार्थी कुटुंबप्रमुखांच्या बँक खात्याशी आधार, तसेच मोबाईलसंबंधित रेशन दुकानात तीन महिन्यांतून एकदा तरी बायोमेट्रिक देऊन प्रमाणानुसार तांदूळ घेतलेला असावा. डीबीटीद्वारे रक्कम जमा झाल्याबाबत संबंधितांच्या मोबाईलवर संदेश (मॅसेज) पाठविण्यात येत आहे. क्रमांकाची जोडणी (ई केवायसी) करावी. आपले बँक खाते सक्रीय करावे. एखाद्या वेळेस बँक खात्यात योजनेअंतर्गत रक्कम जमा होत नसल्यास जवळच्या टपाल खात्यात आयपीबीपी खाते सुरू करावे.
Belgaum Anna Bhagya Scheme DBT Bank ₹ 170 belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum Anna Bhagya Scheme DBT Bank ₹ 170
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310