Anna Bhagya Scheme 5kg Rice DBT
बेळगाव—belgavkar : राज्य सरकारने अन्नभाग्य योजनेंतर्गत अतिरिक्त 5 किलो तांदूळ देण्याची योजना जारी केली आहे. मात्र, या योजनेत बीपीएल रेशनकार्डधारक कुटुंबांना अद्याप तांदळाऐवजी प्रतिव्यक्ती ₹ 170 रुपये दिले जात आहेत. यंदा तांदूळ उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे तांदूळ मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे यापुढेही लाभार्थ्यांना तांदळाऐवजी रक्कमच दिली जाण्याची शक्यता आहे (Anna Bhagya Scheme).
काँग्रेस सरकारने निवडणुकीदरम्यान 5 गॅरंटी योजनांची घोषणा केली होती. त्यापैकी अन्नभाग्य योजनेंतर्गत 10 किलो तांदूळ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तांदळाचा पुरेसा साठा नसल्याने सरकारला पैसे देणे भाग पडले होते. दरम्यान, रेशन दुकानदारांनी तांदळाचा पुरवठा करावा, अशी मागणी केली होती. मात्र, तांदूळसाठा उपलब्ध नसल्याने सरकारकडून प्रतिव्यक्ती 170 रुपये दिले जात आहेत. सरकारने तांदूळ खरेदीसाठी इतर राज्यांशी संपर्क साधला आहे. मात्र, यंदा तांदूळ उत्पादनात घट झाली आहे. परिणामी इतर राज्यांतूनही तांदूळ मिळणे अशक्य बनले आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत पर्याय म्हणून DBT मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची कार्यवाही आणखी काही महिने सुरू राहणार असल्याचे दिसत आहे.
प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ आणि ₹ 170 रुपये दिले जात आहेत. सरकारने तांदूळ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पुरेशा साठ्याअभावी पर्यायी व्यवस्था म्हणून निधी दिला जात आहे. ऑक्टोबरनंतर तांदूळ देणार, असे सांगण्यात आले होते. मात्र, जानेवारी आला तरी अद्याप निधीच दिला जात आहे. त्यामुळे पुढील वर्षभर तरी लाभार्थ्यांना तांदळाऐवजी निधीवरच समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.
Belgaum Anna Bhagya Scheme 5kg Rice DBT belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum Anna Bhagya Scheme 5kg Rice DBT
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements