हलक्या व दुचाकी वाहनांना हा मार्ग खूला राहणार
बेळगाव—belgavkar : 5 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंत अनमोड घाटमार्ग अवजड वाहनांना बंदचा आदेश कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. तर हलक्या व दुचाकी वाहनांना हा मार्ग खूला राहणार असल्याचे म्हटले आहे. रामनगर येथून अनमोड-गोवा जाणाऱ्या छोट्या वाहनांना जातेवेळी रामनगर-तिनईघाट-मारसेगाळ-अनमोड हा एकेरी मार्ग दिला आहे. तर गोव्यावरून येताना अनमोड-कॅसरलॉक-चांदेवाडी-जगलबेट हा एकेरी मार्ग दिला आहे. अवजड वाहनांसाठी हुबळी-धारवाड व बेळगाव आदी भागातून येणाऱ्या वाहनांसांठी अळणावर-हल्याळ-यल्लापूर-कारवार हा मार्ग दिला आहे. तर अजूनही बसबाबत ठाम निर्णय झाला नसून कॅसरलॉक व मारसेगाळ मार्ग अरूंद व वळणाचा असल्याने येथून बसेस घालणे धोक्याचे असल्याची सूचना दिल्याने या मार्गावरून बसेस बंद केल्यास गोवा येथे जाण्यासाठी पूर्वीप्रमाणेच खानापूर-चोर्ला मार्गाचा अवलंब करावा लागेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे अवजड वाहतूक करणारे कोंडीत सापडले आहेत.
गोवा-बेळगाव महामार्गावरील तिनईघाट नजिकच्या देवळी येथील रेल्वेगेटचे डबलींग तसेच गेटच्या दोन्ही बाजूला 100 मी.चा सिमेंटीकरणाचा रस्ता बनविण्यासाठी रेल्वे ठेकेदारांनी कारवार जिल्हाधिकाऱ्यांकडे 20 दिवसांसाठी महामार्ग बंदबाबत मागणी केली होती. त्यामुळे यासाठी कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी दोनवेळा रेल्वे ठेकेदार तसेच एनएच अधिकारी, फॉरेस्ट, पोलीस विभाग आदी संबंधीत खात्याची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत एनएच अधिकाऱ्यांना सध्या रेल्वे तसेच एनएच विभागाला मिळून एकाचवेळी महामार्ग बंद करून देण्याचे सांगण्यात आले होते.
परंतु एनएच विभागाने खानापूर-अनमोड रस्ताकामाचा ठेकेदार लवकर काम करण्याचा योग्यतेचा नसल्याने आपल्याला इतक्यात बंद नकोचे लेखी स्वरूपात दिले होते. परंतु तोवर रेल्वे विभागाचे काम ताटकळत पडत असल्याने कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी एनएच अधिकाऱ्यांना महामार्ग बंदचा आदेश घेतल्यास आताच घ्या. अन्यथा नंतर मिळणार नाही, असे बजावले.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements