बेळगाव—belgavkar : अज्ञात चारचाकी वाहनाने पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना मागून धडक दिल्याने एका वारकऱ्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर अन्य पाच वारकरी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास सांगोला-मिरज रस्त्यावरील काळूबाळू वाडीजवळील सागर हॉटेलसमोर घडली. जानू बाळू पाटील (वय 53, रा. म्हसोबा हिटणी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे मृत पावलेल्या नाव आहे.
तर बाळू शंकर पुजारी (वय 63), प्रतिभावसंत पाटील (वय 60), महादेवी शिवपुत्र तेली (वय 50), सीमा विनायक सुतार (वय 38, सर्व रा. म्हसोबा हिटणी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) व शेजारील गाव कोननकेरी येथील अशोक तोदले (वय 58) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरुवारी सर्व वारकरी सांगोला-मिरज रोडवरील विठ्ठलवाडीचे मागे अर्धा कि.मी. मारुती मंदिर घोरपडे वाडी येथून पहाटे पायी वारीकरिता सांगोलाच्या दिशेने रवाना झाले. सर्व पायी वारकरी हे काळूबाळूवाडी येथील हॉटेल सागरच्या समोर पोहचले असता वसंत पाटील यांना धडकण्याचा मोठा आवाज आला. बाजूस त्यांची पत्नी तसेच इतर चारजण जमिनीवर कोसळले व आरडाओरडा सुरु झाली. यामध्ये हे सर्वजण जखमी अवस्थेत कोसळले होते.
Belgaum Accident Sangli Miraj Road Killed belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Accident Sangli Miraj Road Killed
Belgaum Accident Sangli Miraj Road Killed
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements