किल्ला तलावाजवळ तरुण व तरुणीला मारहाण
बेळगाव—belgavkar belgaum moral policing बेळगाव fort lake : किल्ला तलावाजवळ शनिवारी प्रेमीयुगुल असल्याच्या संशयावरुन तरुण व तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी 17 जणांविरोधात मार्केट पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून, त्यापैकी 9 जणांना अटक केली आहे, अशी माहिती बेळगाव पोलिस उपायुक्त जगदीश रोहन यांनी दिली. पोलिस उपायुक्त म्हणाले, किल्ला तलावाजवळ बसलेल्या तरुण-तरुणीला टोळक्याकडून सुमारे तीन ते चार तास कोंडून लोखंडी रॉडसह काठीने बेदम मारहाण करण्यात आली.
या संदर्भातील तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून 9 जणांना हल्लेखोरांना अटक केली आहे. त्यापैकी दोघे अल्पवयीन असून, इतर 7 संशयितांत महम्मदहुसेन ऊर्फ सैबाज सूरअहमद इमामदार (वय 22, वड्डरछावणी, रामनगर), अतिफअहमद अब्दुलमजीद शेख (वय 22, शिवाजीनगर), महम्मदअमन गुलामहुसेन बाबूकसवार (वय 27, पहिला क्रॉस, आझादनगर), सैफअली नसिममल्लीन इस्माईल मगदूम (27, रामनगर बेळगाव), उमर सादिक बडगेर (वय 19, वीरभद्रनगर), रिहान महम्मदगौस रोटीवाले (वय 19, मार्केट स्ट्रिट कॅम्प), अजान अबेदिन कालकुंद्री (वय 19, तिसरा क्रॉस, वीरभद्रनगर, बेळगाव) यांचा समावेश आहे.
बेळगाव येथील किल्ला तलावाच्या काठावर बसलेल्या तरुण-तरुणीला येथील एका शेडमध्ये ओढून नेऊन मारहाण केली. बेळगाव तालुक्यातील एका गावातील हे दोघे युवानिधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आले होते. मात्र, सर्व्हर बंद असल्यामुळे नसल्याने सेवा केंद्र कर्मचाऱ्यांनी त्यांना दुपारी तीन वाजता येण्याचे सांगितले. यामुळे वेळ घालवण्यासाठी ते किल्ला तलाव येथे दुपारी 1 वाजता बसले. त्यावेळी तेथे संशयितांचे टोळके आले. येथे मुलीसोबत का बसला आहेस? अशी विचारणा करीत त्यांना किल्ला तलावाजवळील शेडकडे नेऊन सुमारे 3 तास अमानुष मारहाण केली.
यावेळी तरुणाने काकांशी संपर्क साधला. काका येथे पोहचल्यानंतर किल्ला तलावाच्या बाजूला शेडमध्ये मारहाणीचा आवाज आला. त्यांनी सुटका करून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मार्केट पोलिसांनाघटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सचिन लमानी (वय 20) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मार्केट पोलिसांनी 17 जणांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यापैकी 9 जणांना अटक केली आहे. उर्वरितांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
Belgaum बेळगाव youth beaten fort lake moral policing belgavkar
belgaum moral policing बेळगाव fort lake
Belgaum बेळगाव belgav
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements