धक्कादायक Alaska Airlines Boeing Video पाहा
Alaska Airlines Boeing Video : (Alaska Airlines grounds Boeing 737-9 fleet following midair window blowout) : अलास्का एअरलाईन बोईंग 737-9 MAX ला एका आपातकालीन घटनेला सामोरे जावे लागले आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर त्याचा एक दरवाजा हवेत उडून गेला. एका प्रवाशाने या घटनेचा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की कॅबिनचा एक्झिट दरवाजा विमानापासून वेगळा झालेला आहे. (Alaska Airlines Boeing Video)
विमान पोर्टलँडवरुन कॅलिफॉर्नियातील ओनटारिओकडे निघाले होते. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर विमान परत पोर्टलँड आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर उतरवण्यात आले. विमानामध्ये 171 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात तपास करण्यात येईल आणि कळवण्यात येईल, असं अलास्का एअरलाईन्स प्रशासनाने सांगितले.
Alaska Airlines Boeing Video
🚨#BREAKING: Alaska Airlines Forced to Make an Emergency Landing After Large Aircraft Window Blows Out Mid-Air ⁰⁰📌#Portland | #Oregon
⁰A Forced emergency landing was made of Alaska Airlines Flight 1282 at Portland International Airport on Friday night. The flight, traveling… pic.twitter.com/nt0FwmPALE
— R A W S A L E R T S (@rawsalerts) January 6, 2024
यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने सांगितलं की, अलास्का एअरलाईन्स फ्लाईटसंदर्भातील या घटनेचा आम्ही तपास करत आहोत. विमान 16,325 फूट उंचीवर पोहोचले होते. त्यानंतर विमानाला परत पोर्टलँड विमानतळावर लँड करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, बोईंग 737-9 MAX अलास्का एअरलाईन्समध्ये 1 ऑक्टोबर 2023 मध्ये सामाविष्ट करण्यात आले होते. त्यानंतर 11 नोव्हेंबर 2023 मध्ये प्रवासी वाहतुकीसाठी याचा वापर सुरु करण्यात आला होता. आतापर्यंत या विमानाचे 145 फ्लाईट झाले असल्याची माहिती फ्लाईटट्रेडरने दिली आहे.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements