अक्षय कुमार म्हणाला, ‘कसं सहन करू?’ #ExploreIndianIslands #ExploreIndia #Lakshadweep
Akshay Kumar joins boycott Maldives tourism call : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप (India’s smallest Union Territory Lakshadweep) यात्रेची सगळीकडे चांगलीच चर्चा आहे. लक्षद्वीपची सुंदरता पाहून आता अनेकांना तिथे फिरायला जाण्याची इच्छा होते. या सगळ्यात मालदीव देशाच्या एका मंत्र्यानं एक पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर वाद सुरु केला आहे (Republic of Maldives is an archipelagic state and country in South Asia, situated in the Indian Ocean). मंत्री अब्दुल्ला महजूम माजिद यांनी भारतानं मालदीववर निशाणा साधण्यावर आरोप केला (Maldives minister Mariyam Shiuna). त्याशिवाय भारतीयांविरोधात अनेक गोष्टी देखील सोशल मीडियावर बोलण्यात येत आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षयनं त्याच्या X म्हणजेच आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये अक्षयनं भारतीयांविरोधात असलेल्या काही पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ते शेअर करत अक्षय म्हणाला, ‘मालदीवच्या काही नेत्यांनी भारतीयांविरोधात काही चुकीच्या किंवा द्वेश पसरवणाऱ्या कमेंट केल्या आहेत. सगळ्यात जास्त या गोष्टीचं होतंय की ते असं काही अशा देशाविषयी बोलत आहेत, ज्या देशातून त्यांना सगळ्यात जास्त पर्यटक भेटतात. आपण आपल्या शेजाऱ्यांना खूप चांगली वागणूक देतो पण आपल्या विरोधात बोलल्या जात असलेल्या या गोष्टी आपण कशा सहन करू शकतो? मी स्वत: मालदीवला अनेकदा गेलो आणि नेहमीच त्यांचं कौतुक केलं, पण सगळ्यात आधी प्रतिष्ठा येते. चला तर आता ठरवूया भारताचे द्वीप फिरूया आणि आपल्या इथल्या पर्यटनाला प्रोत्साहन देऊया.’ यासोबतच अक्षयनं #ExploreIndianIslands हे हॅशटॅग देखील वापरलं आहे.
जॉन अब्राहम ट्वीट करत म्हणाला, ‘भारताकडून मिळणारी चांगली सोय, सुविधा, अतिथी देवो भवं हा विचार आणि सुंदर असं मरीन लाइफ पाहायचं असेल तर लक्षद्वीप हे एक ठिकाण आहे.’ दरम्यान, अक्षय शिवाय जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर, सलमान खान पासून क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं देखील पोस्ट केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी मालदीवला बॉयकॉट करा असं म्हटलं आहे. आता तिथे जाणं बंद करा असं देखील सांगितलं आहे. तर अनेकांनी त्यांचे मालदीवचे त्यांची बूकिंग कॅन्सल केले आहेत.
अक्षयच्या कामाविषयी बोलायचे झाल्यास तो लवकरच बडे मिया छोटे मिया या चित्रपटात दिसणार आहे. त्याशिवाय वेलकम टू द जंगल, हेरा फेरी 3, सिंघम अगेन, खेल खेल मैं, स्काय फोर्स, सी संकरण नायर यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. तर दुसरीकडे त्याचा हाऊसफूल आणि वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांमध्ये देखील तो दिसणार आहे.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310