ISRO ची ऐतिहासिक कामगिरी Aditya L1 Mission
Aditya L1 Mission : भारताची पहिलीच सौरमोहीम, आदित्य एल-1 ही यशस्वीपणे पार पाडून ISRO ने नवा इतिहास रचला आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ हा उपग्रह पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर (Lagrange Point) प्रस्थापित करण्यात आला आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते (Aditya L1 spacecraft successfully enters final Halo orbit). सुमारे चार महिन्यांचा प्रवास करून हा उपग्रह याठिकाणी पोहोचला. पंतप्रधान मोदींनी X पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
ISRO : Indian Space Research Organisation
Aditya L1 यानाने ISRO ला एक संदेश देत आपण सुरक्षितपणे एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचल्याचं सांगितलं आहे. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे. “एवढ्या दूर असूनही मी तुमच्या अगदी जवळ आहे. आपण सूर्याची गुपिते आता उघड करणार आहोत” अशा आशयाची पोस्ट इस्रोच्या आदित्य एल-1 या एक्स हँडलवरुन करण्यात आली आहे.
इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी भारताच्या वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे. “अगदी जटिल असं स्पेस मिशन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन.. मी आणि संपूर्ण देश आज या वैज्ञानिकांचं कौतुक करत आहे.” अशा आशयाची पोस्ट पंतप्रधानांनी आपल्या एक्स हँडलवरून केली आहे.
आज (6 जानेवारी) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास इस्रोच्या वैज्ञानिकांनी या उपग्रहाला एल-1 बिंदूवरील हेलो कक्षेत (L1 Halo Orbit) प्रस्थापित करण्यासाठी मॅन्यूव्हर राबवले. अगदी अलगदपणे आदित्य उपग्रह याठिकाणी ठेवण्यात आला. आता इथूनच पुढील पाच वर्षेे तो सूर्याचं निरीक्षण करेल, आणि मिळालेली माहिती इस्रोला पाठवेल. आदित्य उपग्रहासोबत सात पेलोड पाठवण्यात आले आहेत. यातील चार पेलोड हे थेट सूर्याचं निरीक्षण करून त्याचा अभ्यास करतील, तर इतर तीन पेलोड हे सोलार इमिशनचा अभ्यास करतील. पुढील पाच वर्षे आदित्य सूर्याचा अभ्यास करत राहणार आहे. यातून कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इंजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअर क्रियांची माहिती मिळणार आहे. अंतराळातील हवामानाचा अभ्यासही यामुळे करता येणार आहे.
लॅग्रेंज पॉइंट काय असतात? : लॅग्रेंज पॉइंट (Lagrange Point) या अवकाशातील अशा जागा असतात, जिथे सूर्याचं गुरुत्वाकर्षण आणि जवळच्या एखाद्या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण बल हे समान असतं. यामुळे या पॉइंटवर ठेवण्यात आलेली वस्तू एकाच ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी जास्त उर्जा खर्च करण्याची गरज भासत नाही. पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर L1 हा लॅग्रेंज पॉइंट आहे. येथे स्थिरावलेली कोणतीही वस्तू सूर्याभोवती पृथ्वीसारखेच भ्रमण करते. एल-1 या लॅग्रेंज बिंदूवर WIND, ACE आणि डीप स्पेस क्लायमेट ऑब्जर्वेटरी हे नासाचे तीन उपग्रह आधीपासून आहेत. यासोबतच नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने संयुक्तपणे लाँच केलेला सोलार अँड हेलिओस्फेरिक ऑब्जर्वेटरी (SOHO) हा उपग्रह देखील याठिकाणी आहे.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements