काय म्हणाले गोविंददेव महाराज?
अयोध्येमध्ये सध्या तंबूत विराजमान असलेली मूळ रामलल्लाची मूर्ती ही…
अयोध्या : ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती, तो क्षण अवघ्या काही तासावर येऊन ठेपलाय. सोमवारी राम मंदिरात (Ram Temple) प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) सोहळा संपन्न होणार आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. अयोध्येमध्ये सध्या तंबूत विराजमान असलेली मूळ रामलल्लाची मूर्ती ही राममंदिराच्या गाभाऱ्यातील नवीन राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिरातील गाभाऱ्यातच ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
रामलल्लाच्या मूळ विग्रहाबद्दल बोलताना स्वामी गोविंददेवगिरी म्हणाले, ‘‘सध्या तंबूमध्ये विराजमान असलेली मूर्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे राममंदिरातील नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर ही मूर्ती राममंदिरातील गाभाऱ्यातच विराजमान होणार आहे. ही मूर्ती पाच ते सहा इंचाची असून दुरून ही मूर्ती पटकन दिसत नसल्याने नवी मोठी मूर्ती बनवून घेण्यात आली आहे.’’
राम मंदिरात विराजमान करण्यासाठी देशभरातून 3 मूर्ती घडवून घेण्यात आल्या होत्या. पैकी ज्या दोन मूर्तींची प्राणप्रतिष्ठेसाठी निवड करण्यात आलेली नाही, त्या मूर्ती ट्रस्टकडे असून त्या अत्यंत सन्मानाने ठेवण्यात येणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. राममंदिरासाठी आलेल्या खर्चाबद्दल सांगताना स्वामी गोविंददेवगिरी म्हणाले की, मंदिराच्या निर्मितीसाठी आतापर्यंत ₹ 1100 कोटी रुपये खर्च आला असून अजून अंदाजे ₹ 300 कोटी रुपये खर्च येणार आहे.
Acharya Govind Dev Giri Pran Pratishtha Ayodhya Acharya Govind Dev Giri Pran Pratishtha Ayodhya
Acharya Govind Dev Giri Pran Pratishtha Ayodhya
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements