बेळगाव-belgavkar : बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख (SP) डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्यासह ५ आयपीएस अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक खाते तयार केले. याद्वारे त्यांच्या मित्रांकडे पैसे मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा सीईएन पोलिसांनी दोघांना अटक केली.
विजयकुमार श्रीकिशोरीलाल तिवारी (वय ४६, रा. मध्यप्रदेश) व अरबाज हसीमखान (वय १९, रा. राजस्थान अशी संशयितांची नावे आहेत.
उपरोक्त दोघा भामट्यांनी पाच आयपीएस अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक खाते तयार केले. यामध्ये बी. एस. न्यामगौडा, बालदंडी, अनुकुमारी, व एम. अरुणा यांचा समावेश आहे. या सर्वांच्या मित्रांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवत मेसेंजरद्वारे संपर्क साधला. बंगळूरयेथील सीआरपीएफमध्ये असलेल्या आपल्या मित्राचे फर्निचर व गृहोपयोगी साहित्य स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवून उपरोक्त आयपीएस अधिकाऱ्यांच्या काही मित्रांकडे पैशाची मागणी केली. जेव्हा असा प्रकार बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. गुळेद यांच्या बाबतही झाला, तेव्हा त्यांनी याचा सखोल तपास हाती घेतला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सीईएनचे निरीक्षक सुनीलकुमार एस. नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधितांना मध्यप्रदेश व राजस्थान येथून अटक केली.
5 Fake Facebook Accounts of IPS Officers belgaum
5 Fake Facebook Accounts of IPS Officers belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements