- 4 जणांचा होरपळून मृत्यू
- अचानक आग लागल्यामुळे…
वाढत्या उन्हामुळे उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या रविवारी मेरठ जिल्ह्यात धावत्या CNG कारला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, आतील प्रवासी बाहेर पडण्याआधीच आगीने रौद्र रुप धारण केले आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत प्रवाशांचाही जागीच होरपळून मृत्यू झाला. गाझियाबादहून हरिद्वारला जाणाऱ्या एका धावत्या सीएनजी कारला मेरठ जिल्ह्यातील जानी पोलीस स्टेशन परिसरात आग लागली.
काही वेळातच आग इतकी वाढली की, कारमधील प्रवाशांना जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही आणि गाडीतील सर्व प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये ललित (20), त्याची आई रजनी (20), राधा (29) आणि कविता (50) यांचा समावेश आहे. मेरठ ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश बहादूर यांनी सांगितले की, हा अपघात रविवारी रात्री 9 वाजता कंवर रोडवर झाला. कारला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कारमधील चारही प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
CNG संचालित सेंट्रो कार सवार 4 लोगों को बाहर निकलने का मौका भी नहीं मिला। चारों जिंदा जल गए। कार दिल्ली निवासी सोहनपाल सिंह के नाम पर है।
📍मेरठ, उत्तर प्रदेश https://t.co/Vqx5c03HbZ pic.twitter.com/rpLDDEfnUE
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) June 2, 2024
एएसपी कमलेश बहादूर यांनी सांगितल्यानुसार, कारला आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. ही एक जुनी सीएनजी कार होती, ज्यामध्ये आफ्टर मार्केट सीएनजी किट बसवण्यात आले होते. या किटला आग लागून ही आग इंजिनपर्यंत पसरल्याचा अंदाज आहे.
सीएनजी गाड्यांना आग का लागते? : कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) हा अत्यंत ज्वलनशील वायू आहे. त्याची थोडीशी गळतीही मोठी दुर्घटना घडू शकते. साधारणपणे, कंपनीने बसवलेल्या सीएनजी कारमध्ये योग्य ती सर्व काळजी घेतलेली असते. पण, नंतर बाजारातून सीएनजी लावलेल्या गाड्या तितक्या सुरक्षित नसतात. थोडे पैसे वाचवण्यासाठी लोक आफ्टर मार्केट एनजी किट लावतात. अनेकदा हे किट खराब असते किंवा ते बसवणारे मेकॅनिक तज्ञ नसतात. त्यामुळेच लोकल सीएनजी किटमुळे आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
4 killed after CNG car catches fire Meerut
4 killed after CNG car catches fire Meerut
4 killed after CNG car catches fire Meerut
4 killed after CNG car catches fire Meerut
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements