माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने क्रिकेटमध्ये एक काळ गाजवला आहे. 2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत युवराज सिंगने सलग 6 षटकार ठोकले होते. तसेच 2011 वर्ल्डकप विजयात मोलाची साथ दिली होती. वनडे वर्ल्डकप 2011 स्पर्धेतही युवराज सिंगची बॅट चालली होती. कँसरशी झुंज देत वर्ल्डकपचं जेतेपद मिळवून दिलं होतं. आयपीएलमध्ये युवराज सिंगचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. असं असताना युवराज सिंग आता नव्या इनिंगसाठी सज्ज झाल्याची चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत युवराज सिंग भाजपाकडून रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युवराज सिंग यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे. पंजाबच्या गुरुदासपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेता सनी देओल मागच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाकडून जिंकला होता. आता या जागेसाठी युवराज सिंग याच्या नावाची चर्चा होत आहे.
एकीकडे चर्चांना उधाण आलं असतान युवराजच्या कुंटुंबाकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे बातम्यांना पेव फुटलं आहे. राजकीय प्रवेशाच्या बातम्यांना अधिक बळ मिळताना दिसत आहे. युवराज सिंगचा साथीदार गौतम गंभीर यापूर्वी भाजपाच्या तिकिटावर लोकसभेत पोहोचला आहे. तर हरभजन सिंगला आपकडून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. मोहम्मद अझरुद्दीन आणि कीर्ती आझाद यांनीही लोकसभेची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे युवराज सिंगही निवडणुकीच्या रिंगणात दिसला तर आश्चर्य वाटायला नको.
पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपाच्या तिकीटावर सनी देओलने 82,459 मतांनी विजय मिळवला होता. सनी देओलला 5,58,719 मतं पडली होती. तर काँग्रेसचा उमेदवार सुनिल जाखरला 4,76,260 मतं पडली होती. दुसरीकडे, 2017 मध्ये अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनानंतर गुरुदारपूरमध्ये पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा जाखर यांनी विजय मिळवला होता. युवराज सिंगने टीम इंडियासाठी 40 कसोटी, 304 एकदिवसीय आणि 58 टी20 सामने खेळला आहे. कसोटीत 1900 धावा आणि 9 गडी बाद केले आहेत. तर वनडेत 8701 धावा आणि 111 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी20 क्रिकेटमध्ये 1177 धावा करत 28 गडी नावावर केले आहेत.
Yuvraj Singh to join BJP Loksabha Election
Yuvraj Singh to join BJP Loksabha Election
Yuvraj Singh to join BJP Loksabha Election
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements