Did BJP Win Over 100 Seats with a Margin of Less Than 1000 Votes?
- निवडणूक आयोगाची आकडेवारी काय सांगते? Fact Check
- 30 जागांवर 500 पेक्षा कमी मतांच्या फरकाने विजय
Fact Check : These figures are FALSE. The BJP ‘s lowest victory margin was 1,587
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा 2024 च्या निवडणुकीत भाजपने 30 जागांवर 500 पेक्षा कमी मतांच्या फरकाने आणि 100 मतदारसंघात 1000 पेक्षा कमी मतांनी विजय मिळवला असल्याचा दावा सोशल मिडीयावरती केला जात आहे.
The magic of EVM’s & @ECISVEEP needs to be investigated The BJP has ➖- Won 30 seats with a margin of less than 500 votes.- Won more than 100 seats with a margin of less than 1000 votes.These seats should be analysed by by 3 retired SC Justices.- Ashoka University…— B M Sandeep (@BMSandeepAICC) June 6, 2024
काय आहे सत्य? : भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेटाचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यावर, असे आढळून आले की, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने जिंकलेली जागा सर्वात कमी फरकाने 1,587 मते होती. ओडिशाच्या जाजपूर मतदारसंघातून भाजपचे रवींद्र नारायण बेहरा यांनी 5,34,239 मते मिळवून बीजेडीच्या सर्मिष्ठा सेठी (5,32,652) यांचा 1,587 मतांच्या फरकाने पराभव केला होता. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा अन्य कोणताही उमेदवार 1,587 पेक्षा कमी फरकाने विजयी झालेला नाही.
पक्षाचा दुसरा सर्वात कमी फरकाने विजय जयपूरमध्ये झाला होता, जिथे पक्षाचे नेते राव राजेंद्र सिंह यांनी काँग्रेसच्या अनिल चोप्रा यांच्याविरुद्ध 1,615 मतांनी विजय मिळवला. एकंदरीत, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत फक्त 7 भाजप उमेदवारांनी 5,000 पेक्षा कमी मतांच्या फरकाने विजय मिळवला.
लोकसभा निवडणूक सर्वात कमी फरकाने कोण जिंकले? : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र दत्ताराम वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. वायकर यांना 4,52,644 मते मिळाली, तर शिवसेनेचे UBT उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांना 4,52,596 मते मिळाली. त्यामुळे भाजपने 500 पेक्षा कमी मतांच्या फरकाने 30 जागा जिंकल्याचा आणि 1000 पेक्षा कमी मतांच्या फरकाने 100 जागा जिंकल्याचा व्हायरल दावा खोटा आहे.
निष्कर्ष : भाजपने 500 पेक्षा कमी मतांच्या फरकाने 30 जागा जिंकल्याचा आणि 1000 पेक्षा कमी मतांच्या फरकाने 100 जागा जिंकल्याचा व्हायरल दावा खोटा आहे. (याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून आम्ही याचं भाषांतर केलेलं आहे.)
BJP lowest victory margin was 1587
BJP lowest victory margin was 1587
BJP lowest victory margin was 1587
BJP lowest victory margin was 1587
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements