बेळगाव—belgavkar : बसच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या फुलबाग गल्ली येथील एका वृद्ध महिलेचा गुरुवारी खासगी इस्पितळात मृत्यू झाला. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात याची नोंद झाली आहे. सुमन सुरेश हलगेकर (वय 65 रा. फुलबाग गल्ली) असे त्या वृद्धेचे नाव आहे. सोमवार दि. 6 मे रोजी सायंकाळी रेल्वेस्थानकाजवळील कारवार बस स्टँडवर ही घटना घडली होती.
बसखाली सापडून सुमन या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना त्याच दिवशी खासगी इस्पितळात दाखल केले होते. उपचाराचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला. सुमन व कुटुंबीय लग्नाहून परतले होते. सायंकाळी ज्या बसमधून त्या उतरल्या. त्याच बसखाली सापडून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. मात्र, उपचाराचा उपयोग न होता या वृद्धेचा मृत्यू झाला. शुक्रवारी सुमन यांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती, सासू, दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
woman from Phulbagh Galli died found under wheel of bus
woman from Phulbagh Galli died found under wheel of bus
woman from Phulbagh Galli died found under wheel of bus
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements