बेळगाव-belgavkar : भात मळणी यंत्रामध्ये सापडून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बसुर्ते येथे रविवारी सायंकाळी घडली. बसुर्ते येथील शांता पुंडलिक बेनके (वय 68) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
शांता यांचा भात मळणी यंत्रामध्ये पदर अडकला, त्यानंतर बेल्टमध्येच त्या पूर्ण ओढल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला. अलीकडे अनेक शेतकरी शेतामध्ये भात मळणी यंत्राचा उपयोग करुन झटपट मळणी करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. याचप्रमाणे बसुर्ते या गावांमध्येसुद्धा यंत्राद्वारे भाताची मळणी सुरु असताना शांता या मळणी यंत्राशेजारी काम करत होत्या.
अचानक त्यांचा पदर या मशिनीत अडकला गेला. आणि मशीनच्या वेगाने त्या मशीनमध्ये खेचल्या गेल्याने त्यांचा मशिनमध्ये अडकून गळफास लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तातडीने त्यांना बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी नेण्यात येत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे.
#Belgaum #ShantaBenke #TragicIncident #FarmAccident #RiceHarvesting #AgricultureSafety #MachineryHazard #RuralLife #Farmers #SafetyFirst #CommunitySupport #BelgaumNews #Maharashtra #FarmersLife #AccidentAwareness #FamilyLoss #Grief #SupportLocalFarmers #SafetyInAgriculture #HeartbreakingStory
Woman dies after being trapped in rice threshing machine
Woman dies after being trapped in rice threshing machine
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements