बेळगाव : कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. मागडी मतदार संघाचे आमदार एच. सी. बाळकृष्ण यांनी आवाज उठवला असून नेत्यांच्या मेहनतीची दखल घेऊन आपल्या समाजाला मुख्यमंत्रिपद द्यावे, असे प्रतिपादन केले.
ते म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 136 जागा जिंकल्या. त्यामागे शिवकुमार यांचे मोठे प्रयत्न आहेत.
शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्री होण्याची पात्रता आणि क्षमता दोन्ही आहेत. वक्कलिग समाजाला मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी सर्वांची मागणी आहे. आम्ही आताच काही द्यायला सांगत नाही, संधी मिळेल तेव्हा मुख्यमंत्रीपद द्यावे. ज्यांनी पक्षासाठी काम केले, त्यांची मेहनत ओळखली पाहिजे. याबाबत हायकमांडने योग्य तो निर्णय घ्यावा. मुख्यमंत्रीपदी समाजाला संधी मिळावी, असे माझे वैयक्तिक मत आहे. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार या दोघांनी एकत्र येऊन पक्षाला सत्तेत आणले. पक्ष त्यावर विचार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Congress MLA Wishes DK Shivakumar to Become CM of Karnataka
Congress MLA Wishes DK Shivakumar to Become CM of Karnataka
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements