धक्कादायक VIDEO किनारी शहराजवळ ज्वालामुखीचा उद्रेक
आतापर्यंत पूर आणि त्सुनामीच्या प्रलयाच्या अनेक घटना, व्हिडिओ पाहिले असतील. अशा महाप्रलयांमध्ये मोठी मोठी शहरेही क्षणात उध्वस्त होतात. मात्र सध्या सोशल मीडियावर पाण्याचा नव्हे तर पाण्यासारखा धगधगता लाव्हा वाहत असल्याचा धक्कादायक अन् हादरवुन टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आहे, ग्रिन्डाविक शहरातील (Iceland volcano: Lava flows into Grindavik). 18 डिसेंबर रोजी इसलँडमधील ग्रिन्डाविक या किनारी शहराजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाला (Lava is flowing into Grindavik as Icelands)
स्फोटानंतर आकाशात धुराचे प्रचंड लोट दिसू लागले आणि सर्वत्र लाव्हा पसरला. मात्र, चार हजार लोकसंख्या असलेले हे शहर ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वीच रिकामे करण्यात आले. ज्वालामुखी कधीही उद्रेक होऊ शकतो असा इशारा शास्त्रज्ञांनी जारी केला होता. कारण कवचाखालून वाहणाऱ्या मॅग्मामुळे ग्रिन्डाविकला नोव्हेंबरपासून अनेक भूकंप जाणवत होते. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर सुरुवातीला हा लावा निवासी भागातून विरुद्ध दिशेने वाहत होता. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होणार नाही, असे वाटत होते.
मात्र हळूहळू हा लाव्हा सगळीकडे पसरू लागला. रस्त्यांमध्ये खड्डे दिसू लागले आणि त्यांच्या आतून मॅग्मा बाहेर येऊ लागला, ज्यामुळे शहर पूर्णपणे नष्ट झाले. ग्रिन्डाविकमध्ये मच्छीमारांची वस्ती आहे, म्हणून याला मासेमारी शहर म्हणतात. आता लावा इथली रिकामी घरे उद्ध्वस्त करत आहे. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतेच इंस्टाग्रामवर bsteinbekk या अकाऊंटवरुन काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ही छायाचित्रे ड्रोनमधून घेण्यात आली असून, त्यात लावा नदीसारखा वाहत असून घरांची राख झाली आहे. येथे जमिनीतून कारंज्याप्रमाणे लावा फुटत असून या भागाला आइसलँडच्या राष्ट्रीय पोलीस आयुक्तांनी धोकादायक घोषित क्षेत्रही केले आहे.
Volcano Erupts in Iceland Grindavik. Volcano Erupts in Iceland
Volcano Erupts in Iceland Grindavik
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements