जीव वाचवण्यासाठी धावपळ, घटनेचा थरारक VIDEO
Viral Video : बैलगाडा शर्यत प्रत्येक गावात खेळली जाते. या शर्यतीची मजा काही औरच असते. प्रत्येकजण आपल्या बैलांना या शर्यतीसाठी वर्षभरापासून तयार करत असतात. यासाठी बैलांना विशेष खाद्य, चारा, पाणी दिले जाते. त्यांची सर्व प्रकारे काळजी घेतली जाते. शर्यतीत आपलाच बैल जिंकावा असं सर्वांना वाटतं. मात्र ही शर्यत काही प्रमाणात घातकही असते. अशाच एका बैलगाडा शर्यतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मैदानात बैलांची शर्यत आयोजित करण्यात आली आहे.
शर्यत पाहण्यासाठी गावातील सर्व तरुण, लहान मुलं, वयोवृध्द असे सर्वजण जमले आहेत. शर्यत सुरू होते, गावकरी याचा आनंद घेत असतात. तितक्यात एक बैल पिसाळतो आणि रस्ता सोडून थेट जमलेल्या गर्दीकडे धावतो. बैल येत असल्याचं पाहून सर्वचजण घाबरतात. बैल वेगाने धावत सगळ्या माणसांमध्ये शिरतो. यामध्ये नागरिकांची मोठी धांदळ उडते. सर्वजण सैरभैर धावू लागतात. या धावपळीत बैलाच्या पायाखाली देखील काही व्यक्ती येतात. अनेकांना यामध्ये इजा होते. उधळलेल्या बैलापासून वाचण्यासाठी काहीजण झाडावर देखील चढतात. तर आधीपासून झाडावर बसलेल्या व्यक्ती खाली सर्वांची मजा पाहत असतात. बैलांच्या शर्यतीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळालेत. तसेच नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट केल्यात. असे खेळ बंद केले पाहिजेत असं काहींनी म्हटलं आहे. तर काही व्यक्तींनी कमेंटमध्ये काळजी व्यक्त केली आहे. तसेच काहींनी यावर हसण्याचे ईमोजी पाठवलेत.
या आधी देखील सोशल मीडियावर बैलांच्या शर्यतीचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. गावात अशा शर्यतींना फार महत्त्व दिलं जातं. बैल म्हणजे भरपूर ताकद असलेला शेतकऱ्यांचा मित्र. बैलगाडा शर्यत आणि बैलपोळा या दिवशी गावातील सर्वच बैलांना पुरणपोळी खाऊ दिली जाते. तसेच विविध पद्धतीने बैलांना सजवले जाते. मात्र अशा शर्यतीमध्ये नागरिकांच्या सुरक्षेची नीट व्यवस्था करणे देखील गरजेचे आहे.
Viral Video Jallikattu Race
Viral Video Jallikattu Race
Viral Video Jallikattu Race
Viral Video Jallikattu Race
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements