Thank you for food with no oil and mirch masala
Tweet on Vande Bharat train food goes viral
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या पंसतीस उतरली असून देशभरात अनेक मार्गांवर ही ट्रेन सुरू झाली आहे. सुपरफास्ट एक्सप्रेसच्या एक पाऊल पुढे म्हणून वंदे भारत ट्रेनकडे पाहिले जाते. या ट्रेनमधील सुविधा, स्वच्छता आणि गतीमान प्रवासामुळे प्रवाशांनी ट्रेनमधून प्रवास करण्याला पसंती दिली. मात्र, ट्रेनचे तिकीट दर व जेवण यावरुन नेहमीच टीकेचा सामना रेल्वे विभागाला करावा लागतो.
ट्रेनमधील जेवणाच्या गुणवत्तेवर नेहमीच प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडियातून या ट्रेनचं मोठं कौतुक झालं, पण याच सोशल मीडियातून प्रवाशी तक्रारीही मांडताना दिसून येतात. कपिल नावाच्या एका ट्विटर युजरने वंदे भारत ट्रेनमधील जेवणाच्या निकृष्ट दर्जासंदर्भात पोस्ट केली आहे. विशेष म्हणजे या प्रवाशाने ट्रेनमधील जेवणाचे फोटो शेअर करत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पोस्टमध्ये मेन्शन केलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी हेल्दी फूड दिल्याबद्दल धन्यवाद. त्यात ना तेल, तिखट ना मसाला, असे हे वंदे भारतमधील जेवण, अशा आशयाचा मजकूरही प्रवाशाने लिहिला आहे. कपिल यांनी छोले भाजीचा एक फोटो शेअर केला असून हे छोले अगदी पातळ रस्स्यात दिसत आहेत. कपिल यांच्या ट्विटवर अनेकांनी मत व्यक्त करत रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्रालायावर जोरदार टीका केली आहे. तर, काहींनी मिश्कील टोलाही लगावला आहे.
दरम्यान, कपिल यांनी 19 फेब्रुवारी रोजी हे ट्विट केले असून मिलियन्स लोकांनी ते पाहिले आहे. तर, हजारो युजर्सने कमेंट करुन रेल्वे विभागाला संबंधित जेवणावर प्रश्न विचारले आहेत.
Viral food served on Vande Bharat Chole
Viral food served on Vande Bharat Chole
Viral food served on Vande Bharat Chole
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements