Viral Video of Tadoba Tiger
कधी कधी प्राण्याची एखादी कृती मानवाला बरंच काही शिकवून जाते. जंगलातील प्राणी आपल्याला कृतीतून माणसाला संदेश देतो. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. माणूस कधी शिकणार? हाच एक सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय (Tiger Removes Plastic Bottle From Tadoba National Park Waterhole).
सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. वाघाचा एक बछडा तलावाजवळ जातो. सफाई आता चक्क वाघांनी आपल्या हाती घेतल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. निमढेला बफर क्षेत्रात (Nimdhela Buffer Area) एक वाघिण तोंडात प्लास्टिकची बाटली (Plastic Bottle) पाण्यातून बाहेर काढतानाचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या समोर आला आहे. हा व्हिडिओ आहे चंद्रपूरमधल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या नयनतारा वाघाचा…. मानवाने केलेला कचरा हा वाघ उचलतो.
पाण्यात असणारी प्लास्टिकची बाटली तोंडात धरून उचलतो आणि चालू लागतो. अवघ्या 23 सेकंदाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मनाचा ठाव घेतोय. या व्हिडिओतून वाघोबा न कळतपणे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतोय. निमढेला बफर क्षेत्रातील ‘जांभूळडोह’ सिमेंट बंधारा परिसरात 29 डिसेंबर रोजी वन्यप्रेमी दिप काठीकर (Deep Kathikar) यांनी आपल्या कॅमेर्यात हा क्षण टिपला आहे.
Young Tiger’s Encounter with Plastic Sparks Wildlife Conservation Conversation
पर्यावरण संवर्धन किती गरजेचं आहे. यावर अनेकदा बोललं जातं. मात्र हा वाघ न कळतपणे पर्यावरण वाचवण्याचा संदेश देतोय. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर करत या मुक्या प्राण्यांना कळतं आपल्याला कधी कळणार? असा सवाल केला जातोय. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील मुख्य व्याघ्र प्रकल्पांपैकी एक. हा प्रकल्प हा ताडोबा अभयारण्यात आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान देशातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांपैकी एक असून चंद्रपूर जिल्ह्यात आहे. 1955 साली याची स्थापना झाली. ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान.
Tiger Removes Plastic Bottle From Tadoba
Tiger Removes Plastic Bottle From Tadoba
Tiger Removes Plastic Bottle From Tadoba
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements